सफाई करतो तो श्रेष्ठ
By Admin | Updated: October 30, 2015 00:13 IST2015-10-30T00:13:10+5:302015-10-30T00:13:10+5:30
साफसफाई व स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. स्वच्छतेमुळे आरोग्य निरोगी राहते. जो सफाई करतो तो श्रेष्ठ ठरतो. प्रत्येकाने शहर स्वच्छ ठेवले पाहिजे, असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले.

सफाई करतो तो श्रेष्ठ
पिंपरी : साफसफाई व स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे. स्वच्छतेमुळे आरोग्य निरोगी राहते. जो सफाई करतो तो श्रेष्ठ ठरतो. प्रत्येकाने शहर स्वच्छ ठेवले पाहिजे, असे मत महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जगद्गुरू महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच मार्गदर्शन व सत्कार समारंभाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
महर्षी वाल्मीकी आश्रम मिलिंदनगर, पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमास माजी उपमहापौर डब्बू आसवानी, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष अरुण टाक, नगरसदस्य कैलास थोपटे, गुरूबक्ष पहेलानी, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड, प्रताप खैरारिया, सोनाथ बेद, चमन मरोटिया, राजू डुलगज, अमरकुमार गोयर, राजेश बडगुजर, खेमचंद गुहरे, नरेंद्र टाक, राजू परदेशी, सुरेश चनाल, मारुती आव्हाड, आनंद चिडालिया, राजेश कागडा आदी उपस्थित होते.
टाक म्हणाले, ‘‘समाजात दुफळी निर्माण होऊ नये म्हणून समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजकार्य केले पाहिजे. समाजाचे हित जपले पाहिजे. समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असल्यास बेरोजगारी, लाचारी वाढते. तेव्हा सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण दिले पाहिजे. शिक्षण हेच समाजाच्या उन्नतीचे साधन असते.’’
या वेळी माजी उपमहापौर डब्बू आसवानी, सोनाथ बेद व राजू डुलगज यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा, तसेच विविध स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचाही सत्कार या वेळी महापौर, माजी उपमहापौर डब्बू आसवानी व ‘ड’ प्रभाग अध्यक्ष अरुण टाक यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. किशोर केदारी यांनी सूत्रसंचालन केले, तर चमन मरोटिया यांनी आभार मानले. चंद्रकांत नगरकरप्रस्तुत मराठी व हिंदी गीतांचा बहारदार नजराणा असलेल्या आॅर्केस्ट्रा या सांस्कृतिक कार्यक्रमाने जयंती महोत्सवाची सांगता झाली.
(प्रतिनिधी)