सुपे ग्रामस्थांनी पाळला कडकडीत बंद

By Admin | Updated: March 23, 2016 01:09 IST2016-03-23T01:09:54+5:302016-03-23T01:09:54+5:30

शिवकालीन बाजारतळावर एका खासगी मालकाने हक्क सांगून अतिक्रमण केल्याने मंगळवारी (दि. २२) ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. या वेळी सुपेकरांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

The cleanliness of the villagers kept the hard candy | सुपे ग्रामस्थांनी पाळला कडकडीत बंद

सुपे ग्रामस्थांनी पाळला कडकडीत बंद

सुपे : शिवकालीन बाजारतळावर एका खासगी मालकाने हक्क सांगून अतिक्रमण केल्याने मंगळवारी (दि. २२) ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. या वेळी सुपेकरांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बुधवारचा आठवडे बाजार सुरू राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २२) बाजारतळाची मोजणी पोलीस बंदोबस्तात केली. यावेळी भूमिअभिलेख विभागाचे मंगेश हिलाले, मंडलाधिकारी ए. बी. मोहिते, तलाठी आर. आर. जगदाळे, ग्रामविकास अधिकारी आर. के. चांदगुडे आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते. या वेळी जागेच्या हद्द कायम करण्याच्या खुणा येत्या सोमवारी (दि. २८) करण्यात येतील, असे वडगाव निंबाळकरचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सांगितले.
येथील त्यामुळे उद्याच्या बुधवारी बाजार कुठे भरणार, या मनस्थितीत ग्रामस्थ होते. त्यामुळे सोमवारी ग्रामपंचायतीत एक बैठक घेण्यात आली. या वेळी बाजारतळाच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सुपे गाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत झाला होता.
या संदर्भात सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले, की आज (मंगळवारी) बाजारतळाची मोजणी करून घेतली आहे. मात्र, येत्या सोमवारी जागेच्या हद्दी कायम करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील बंद बाजारपेठ सुरळीत सुरू करून बुधवारचा आठवडे बाजार भरवावा, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
(वार्ताहर)

Web Title: The cleanliness of the villagers kept the hard candy