शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम ; पुण्यात २३७ टन कचरा संकलन. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 17:13 IST

पर्यावरणाचा ध्यास आणि परिवर्तनाची आस या ध्येयाने कार्यरत असलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सर्वात मोठ्या स्वच्छता अभियानाची हाक दिली होती.

धनकवडी  : पर्यावरणाचा ध्यास आणि परिवर्तनाची आस या ध्येयाने कार्यरत असलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सर्वात मोठ्या स्वच्छता अभियानाची हाक दिली होती. या पार्श्वभुमीवर राबविण्यात आलेल्या देशव्यापी स्वच्छता मोहिमेअंतर्गत पुण्यात १०९  किलोमीटरच्या रस्त्यांची दुतर्फा साफसफाई करण्यात आली. यात सुमारे २३७  टन कचरा संकलीत करण्यात आला. रविवारी सकाळी सात वाजता राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत ४०१७  स्वयंसेवक सहभागी झाले होते. रस्त्यांसह महापालिका, ससून रूग्णालय, पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय,सेंट्रल बिल्डींग आदी विविध ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छता दूत असलेल्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासह देशभरात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे शहर व उपनगरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची सफाई करण्यात आली. यामध्ये सातारा रस्ता, सहकारनगरचा गोळवलकर रस्ता व मित्र मंडळ रस्ता, पर्वती रस्ता, स्वामी विवेकानंद रस्ता, कोथरूड विभागातील कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, लष्कर भागातील प्रमुख, नगर रस्ता, विमानतळ रस्ता, पुणे विद्यापीठ रस्ता, डेक्कन, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, टिळक रस्ता अशा सर्व प्रमुख रस्त्यांसह हडपसर, कोंढवा आदी सर्व उपनगरांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. विशेषत: ससून रूग्णालय ,शासकीय कार्यालय , दवाखाना , पोलीस स्टेशन , आर. टी. ओ. एसटी वर्कशॉप , विमानतळ असा ४२६८७७ स्क्वेअर फुट परिसराची अंतर्बाह्य सफाई  करण्यात आली. सकाळी सात वाजता एकाच वेळी शहर व उपनगरात या स्वच्छता मोहिमेला सुरूवात झाली. सारसबाग येथे महापौर मुक्ता टिळक , घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक  या मोहिमेत सहभागी झाले होते. 

या मोहिमेसाठी महापालिकेडून कचरा बकेट, ट्रॉली, डंपर, ट्रॅक्टर,  देण्यात आली होती. प्रतिष्ठानने स्वयंसेवकांना खराटे, मास्क, हातमोजे दिले होते. महपालिकेच्या संकलन व्यवस्थेला हातभार लावण्यासाठी प्रतिष्ठानने वाहतूकीच्या वाहनांची व्यवस्था केली होती. प्रतिष्ठानच्या सुचनेनुसार श्री सदस्य पणे यामध्ये उत्सुर्तपणे सहभागी झाले होते.

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMukta Tilakमुक्ता टिळक