हिवरे गावातील तरुणांकडून किल्ले नारायणगडावर स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:30 IST2021-02-20T04:30:43+5:302021-02-20T04:30:43+5:30
गडावरील हस्तमातेच्या मंदिर परिसरात या तरुणांनी स्वच्छता केली. पर्यटकांनी आणलेल्या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांचे प्लॅस्टिक रॅपर, पाण्याचे प्लॅस्टिक ग्लास, ...

हिवरे गावातील तरुणांकडून किल्ले नारायणगडावर स्वच्छता
गडावरील हस्तमातेच्या मंदिर परिसरात या तरुणांनी स्वच्छता केली. पर्यटकांनी आणलेल्या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांचे प्लॅस्टिक रॅपर, पाण्याचे प्लॅस्टिक ग्लास, प्लॅस्टिक कॅरीबॅग इतर कचरा या तरुणांनी गोळा केला. शिवजयंतीच्या दिवशी सकाळी किल्ले नारायणगडावर स्वच्छता करण्याचा हा उपक्रम या तरुणांकडून मागील ३ वर्षांपासून सुरू आहे.
अभिषेक खैरे, रंगनाथ कुंडलिक, भावेश कदम, महेश डोंगरे, आकाश खैरे, करण खरात, निखिल खोकराळे, सदानंद खोकराळे, अभि जाधव, गोकुळ गायकवाड, संकेत वाळुंज, अजय पवार, हृतिक खोकराळे, रोहन डोंगरे, रोहन कुऱ्हाडे, सुजल कदम, धर्मेंद्र चौधरी, कदिल पठाण, कृष्णा गायकवाड, आविष्कार खोकराळे, सोहम खोकराळे या तरुणांनी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सायंकाळी हिवरेतर्फे नारायणगाव येथे छोटेखानी स्वरूपात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले. शिवरायांची जयंती साजरी करताना केवळ जयघोष न करता छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेले समाजोपयोगी उपक्रम राबवायला हवेत. शिवरायांनी पर्यावरण, जलसंधारणासाठी विशेष उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे त्याकाळात दुष्काळ पडला नाही, पर्यायाने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नाही. शिवरायांनी गडकोट किल्ल्यांवर आणि रयतेवर मनापासून प्रेम केले. गडकोट हे आपली ऊर्जा व बलस्थाने आहेत. शिवजयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण, गडकोटांची स्वच्छता राखून पर्यावरण जपण्याचा प्रयत्न करायला हवा, असे हिवरे तर्फे नारायणगाव येथील अभिषेक खैर यांनी सांगितले.
१९ खोडद नारायणगाव
हिवरे तर्फे नारायणगाव येथील तरुणांनी शिवजयंतीनिमित्त किल्ले नारायणगडावर प्लॅस्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.