स्मशानभूमी परिसराची केली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:09 IST2021-04-26T04:09:42+5:302021-04-26T04:09:42+5:30

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील नाभिक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ क-हेकर नेहमीच नाभिक समाजासाठी व इतर समाजासाठीही सामाजिक व ...

Cleaning of the cemetery premises | स्मशानभूमी परिसराची केली स्वच्छता

स्मशानभूमी परिसराची केली स्वच्छता

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील नाभिक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ क-हेकर नेहमीच नाभिक समाजासाठी व इतर समाजासाठीही सामाजिक व विधायक उपक्रम राबवत असतात. नुकत्याच एका दशक्रिया विधीच्या निमित्ताने भैरवनाथनगर येथील वेळनदीच्या काठावर एक तास अगोदर स्मशानभूमीच्या परिसरात गेल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता त्यांच्या निदर्शनास आली तसेच प्लास्टिकच्या कागदांचे साम्राज्यही येथे दिसून आले.सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी स्वच्छतेसाठी कोणाचीही वाट न पाहता स्वतः हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली स्मशानभूमी जवळील नागरिकांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पत्राशेडमध्ये व स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवून अवघ्या तासाभरातच हा परिसर त्यांनी स्वच्छ केल्याने चकाचक दिसू लागला.

२५ तळेगाव ढमढेरे

Web Title: Cleaning of the cemetery premises