पंतप्रधानाची स्वारी येणार असल्याने सीरम इन्स्टिट्यूट परिसरात स्वच्छतेची वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:26+5:302020-11-28T04:09:26+5:30
सिरम कंपनीमध्ये हेलीपॅड आहे. त्यामुळे ते लोहगांव विमानतळावरुन हेलीकॅप्टरने मोदी थेट कंपनीत येणार आहेत. मात्र अन्य अधिकाऱ्यांसाठी रोडवरील गर्दी ...

पंतप्रधानाची स्वारी येणार असल्याने सीरम इन्स्टिट्यूट परिसरात स्वच्छतेची वारी
सिरम कंपनीमध्ये हेलीपॅड आहे. त्यामुळे ते लोहगांव विमानतळावरुन हेलीकॅप्टरने मोदी थेट कंपनीत येणार आहेत. मात्र अन्य अधिकाऱ्यांसाठी
रोडवरील गर्दी हटविण्यात आली आहे. कंपनीत सुमरे 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा गुरूवार पासून तैनात आहे. कंपनीतील बिल्डींग नं.2 मध्ये ते येणार आहेत. त्यामुळे संबंधित कामगारानां सुट्टी देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी 1 वाजता कंपनीत मोदी येणार असून सुमारे 1 तास ते कंपनीत थांबणार आहेत. त्यानंतर पुन्हा ते हेलिकॅप्टरने लोहगांव विमानतळावर जाणार आहेत.
सिरम कंपनीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कंपनीकडे जाणा-या रस्त्यावर पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. आज अनेक अधिकारी यांनी कंपनी परिसर व तयारीची पाहणी केली. कंपनीत हॅलीपॅड असले तरी रस्त्यानेही काही महत्वाच्या व्यक्ती येणार असल्याने किंवा काही पर्याय व्यवस्था म्हणून रस्त्याच्या सुरक्षेकडे ही लक्ष देण्यात आले आहे.
पुणे-सोलापूर रस्ता कधी नव्हे आज वाहतुकीसाठी मोकळा होता, अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील हातगाड्या, फेरीवाले, फ्रूटवाले, पथारीवाले हटविले होते. त्यामुळे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यातील मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचा दौरा दर महिन्याला असला पाहिजे, अशी भावना सामान्य नागरिकांनी व्यक्त केली.
फातिमानगर चौकापासून ते मांजरी फाटा दरम्यान वाहतूक पोलिसांसह खाकी वर्दी तैनात होती. वाहतूक पोलीसही सिग्नलजवळ थांबवल्यानेे वाहनचालकही नियमांचे पालन करीत असल्याचे दिसून आले.