शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पुरप्रवण क्षेत्रांबरोबरच शहरातील सर्व नाले साफसफाई करून मोकळे करा : महापौर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:42 IST

पुणे शहरातील जे नाले सिमेंट पाईपद्वारे बंद केले आहेत ते सर्व नाले खुले करून प्रवाहीत करावेत.

ठळक मुद्देमहापौरांकडून पावसाळापूर्व कामांच्या परिसराची पाहणी

पुणे : पुणे शहरातील पुरप्रवण क्षेत्रांबरोबरच शहरातील सर्व नाले तात्काळ साफसफाई करून मोकळे करावेत, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.    पावसाळापूर्व कामांच्या पाहणी दरम्यान महापौर मोहोळ यांनी, कोथरूड-बावधन, वारजे कर्वेनगर, ढोले पाटील रोड, येरवडा-कळस-धानोरी, नगररोड-वडगावशेरी, वानवडी-रामटेकडी आणि हडपसर-मुंढवा या क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारितील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्यासह पालिकेतील अन्य पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.    यावेळी महापौर मोहोळ यांनी, पुणे शहरातील जे नाले सिमेंट पाईपद्वारे बंद केले आहेत ते सर्व नाले खुले करून प्रवाहीत करावेत असे सांगितले. तसेच कोथरूड स्मशानभूमी येथील पिण्याच्या पाण्याची लाईन शिफ्ट करून, कर्ल्व्हट व स्मशानभूमीची भिंत नव्याने बांधण्याबाबत सांगितले. संपूर्ण शहरातील विविध नाल्यावरुन जाणाऱ्या एमएसईबीच्या केबल्स सुरक्षित करण्याबाबत एमएसईबी प्रशासनाशी येत्या काही दिवसांत पत्रव्यवहार करून त्या तातडीने हटविण्यात याव्यात. शहरात ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा साचतो व ज्या ठिकाणी पुराचे पाणी घुसते अशा ठिकाणी ड्रेनेज विभागाच्या सेवकांमार्फत रोजचे रोज जागा पाहणी करून, त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. पॉवर हाऊस, रास्ता पेठ येथील नाल्यांची साफसफाई करणे. याचबरोबर पुणे शहर व घोरपडी, अनंत टॉकीज येथे कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील मैलापाण्याबाबत ब्रिगेडीअर यांच्याशी पत्रव्यवहार करून, कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील मैलापाणी प्रक्रिया न करता सोडल्यास त्यांच्याकडून शुल्क आकारून महानगरपालिकेने त्यावर प्रक्रिया करावी, अशी सूचनाही महापौरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरRainपाऊस