सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST2020-11-28T04:09:51+5:302020-11-28T04:09:51+5:30
पुणे : मिळकतकराची ५० लाख रूपयांपर्यंची थकबाकी भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अभय योजने’चे शेवटचे तीन दिवस बाकी राहिल्याने व या ...

सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरू राहणार
पुणे : मिळकतकराची ५० लाख रूपयांपर्यंची थकबाकी भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अभय योजने’चे शेवटचे तीन दिवस बाकी राहिल्याने व या दिवशी सुट्टी आल्याने, महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी या तीनही दिवशी शहरातील ३६ नागरी सुविधा केंद्रे मिळकत कर भरणा करण्यासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़
१ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झालेल्या अभय योजनेतून आत्तापर्यंत शहरातील ९४ हजार ८१ मिळकतकर थकबाकीदारांनी २७४ कोटी ४ लाख रूपये मिळकतकर जमा केला आहे़ तसेच या योजनव्दारे महापालिकेने तब्बल १३७ कोटी ४८ लाख रूपयांची शास्तीत (व्याजाच्या रक्कमेत) ८० टक्के सवलत मिळकतकरधारकांना दिली आहे़
अभय योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपत असल्याने अधिकाधिक थकबाकीदारांनी पुढील तीन दिवसात सवलतीचा लाभ घेऊन मिळकतकराची थकबाकी जमा करावी़ अन्यथा १ डिसेंबर,२०२० पासून शास्तीच्या पूर्ण रक्कमेसह थकबाकी जमा करावी लागणार असल्याची माहिती करआकारणी व करसंकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिली आहे़