शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी राहणार बंद
By Admin | Updated: November 11, 2014 00:30 IST2014-11-11T00:30:34+5:302014-11-11T00:30:34+5:30
संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी (दि. 13) संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी राहणार बंद
पुणो : पर्वती जलकेंद्रातील पंपींग स्टेशन, तसेच वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर पंपीग स्टेशन येथील विद्युतविषयक व अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामांसाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी (दि. 13) संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
पर्वती जलकेंद्रातून होणारा शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, डक्केन परिसर, स्वारगेट, पर्वती दर्शन, सहकारनगर, सातारा रस्ता, बिबवेवाडी, धनकवडी, इंदिरानगर, एसएनडीटी रस्ता, कव्रेनगर, कोथरुड, डहाणूकर कॉलनी, लॉ कॉलेज रस्ता, मुकुंदनगर, महर्षीनगर, टीमव्ही कॉलनी, औद्योगिक वसाहत, स्वारगेट, शंकरशेठ रस्ता, मीरा सोसायटी, नाना पेठ, भवानी पेठ, कासेवाडी, घोरपडी पेठ, महात्मा फुले पेठ, गंज पेठ, हरकानगर, राजेवाडी, जुना मोटार स्टॅण्ड परिसर, शितळा देवी, खडकमाळ आळी व सुभाषनगरचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
वडगाव जलकेंद्रातून पाणी पुरवठा होणारा हिंगणो, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, कात्रज, भारती विद्यापीठ व कोंढवा बुद्रुक, तसेच, चतु:श्रृंगी, एसएनडीटी व वारजे जलकेंद्रातून होणारा औंध, बोपोडी, पाषाण, सुतारवाडी, बाणोर, भोसलेनगर, गोखलेनगर, जनवाडी, भुसारी कॉलनी, बावधन, महात्मा सोसायटी, पुणो विद्यापीठ रस्ता, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, शाहू कॉलनी, भूगाव.
तसेच, लष्कर, नवीन होळकर पंपींग व बंडगार्डन जलकेंद्रातून होणारा कळस, धानोरी, लोहगाव, कलवर्ट वस्ती, खेसे पार्क, एअर फोर्स, विद्यानगर, टिंगरेनगर, विश्रंतवाडी, विमानगर, मुळा रोड, खराडी, ठुबे-पाठरे नगर, श्रीराम सोसायटी, सैनिकवाडी, सोपाननगर, खराडी, वडगावशेरी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लक्ष्मीनगर, यशवंत नगर, जय जवाननगर, सुरक्षानगर, माणिकनगर, म्हाडा वसाहत, अशोकनगर, गांधीनगर, नागपूरचाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कल्याणीनगर, आदर्शनगर, हरीनगर,रामवाडी, आळंदी रस्ता, भारतनगर, शांतीनगर, मोहनवाडी, संगमवाडी, फुलेनगर, शांतीनगर, विश्रंतवाडी, प्रतिकनगर, विमाननगर व नगर रस्ता आदी भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार आहेत. तसेच, दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती अधिक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. (प्रतिनिधी)