पुणेकरांच्या स्वयंशिस्तीने थबकले शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:58+5:302021-04-11T04:11:58+5:30
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शनिवार आणि रविवारी लॉॅकडाऊन जाहीर केला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांनाही परवानगी नाही. त्यामुळे नागरिकांनी ...

पुणेकरांच्या स्वयंशिस्तीने थबकले शहर
राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शनिवार आणि रविवारी लॉॅकडाऊन जाहीर केला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांनाही परवानगी नाही. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर येणेच टाळले. शहर आणि उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, पोलीसांनी फार मोठ्या प्रमाणावर कारवाईची गरज पडली नाही.
स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन अशा वर्दळीच्या चौकात तुरळक वाहने दिसून आली आहेत. मध्यवर्ती भागातील टिळक, केळकर, लक्ष्मी, शिवाजी रस्त्यांबरोबरच, कर्वे, सिंहगड, जंगली महाराज रस्त्यांवर शुकशुकाट होता. लोकांनी घरीच राहणे पसंत केले होते. त्यामुळे पोलिसांनाही कारवाई करावी लागली नाही.
शिवाजीनगर परिसरातील एक कंपनी चालू असल्याने महापालिकेने छापा टाकला. ८७ कामगार येथे काम करत होते. या कंपनीला सव्वालाख रुपये दंड करण्यात आला आहे.