शहर ते उपनगर : पुणे-सोलापूर महामार्गामुळे अनुषंगी शहरांची दारे खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 06:47 PM2023-10-17T18:47:32+5:302023-10-17T18:48:09+5:30

पुण्यातील या नव्या परिसरात घरांसह औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे रिअल इस्टेटची वाढ होत आहे

City to Suburbs: The Pune-Solapur highway opened the doors to subsidiary cities | शहर ते उपनगर : पुणे-सोलापूर महामार्गामुळे अनुषंगी शहरांची दारे खुली

शहर ते उपनगर : पुणे-सोलापूर महामार्गामुळे अनुषंगी शहरांची दारे खुली

पुणेः पी. राजेंद्रन, चीफ सेल्स अँड मार्केटिंग ऑफिसर, शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट वाढते नागरीकरण आणि अधिक कनेक्टिव्हिटीमुळे घरांशी संबंधित उपयांची मागणी वाढल्याने अलीकडच्या वर्षांत भारतीय रिअल इस्टेट लँडस्केपमध्ये हादरवून सोडणारी कायापालट (बदल) झालेली आहे. अॅनारॉकच्या अहवालानुसार, 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत पुण्यात विक्री झालेल्या युनिट्समध्ये सर्वाधिक झेप घेतली आहे व तेथे 65% विक्री झालेली आहे. पुण्यात आय.टी. आणि आय.टी.इ.एस. क्षेत्रे सुरू झाल्यावर या भागात रिअल इस्टेटमध्ये महत्वपूर्ण विकास करण्यात आलेला आहे. पुण्यातील सूक्ष्म बाजारपेठांपैकी पुणे-सोलापूर महामार्ग हा असाच एक कॉरिडॉर आहे, ज्याने विकासक, रहिवासी खरेदीदार आणि गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढवली आहे. हा मार्ग दोन मोठ्या शहरांना तर जोडतोच, त्यासोबत आपल्या स्वप्नवत घरांच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी भरपूर संधी देखील प्रदान करत आहे.

त्याच्या वाढत्या प्रसिद्धीस योगदान देणाऱ्या घटकांचा सखोल अभ्यास करूया आणि भविष्यासाठी त्यातून निर्माण होणाऱ्या संधींचा शोध घेऊया.

आर्थिक वाढ व औद्योगिक विकास : पुणे-सोलापूर महामार्ग हा औद्योगिक क्षेत्राच्या जवळ आल्याने आर्थिक विकासाला चालना मिळाली असून, या भागात व्यवसायांना आपले कामकाज प्रस्थापित करण्यासाठी त्याने आकर्षित केलेले आहे. पुणे, मुंबई आणि सोलापूर सारख्या प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध झाल्याने उद्योगांसाठी एक आदर्श स्थान बनलेले आहे आणि यामुळे वितरण केंद्रे व उत्पादन युनिट्स विकसित होत आहेत.

कनेक्टिव्हिटीची पुनर्व्याख्या करणे: घर खरेदीदारांसाठी गेम चेंजर: पुणे-सोलापूर महामार्गात सुधारणा करण्यासाठी आणि त्याची देखभाल करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. यामुळे पुणे-सोलापूर प्रवास खूपच कमी वेळात करता येतो, तेथे सोयी-सुविधा वाढल्या आहेत आणि नवीन निवासी पर्याय उपलब्ध होत चालले आहेत. चार स्तरीय डबल डेकर उड्डाणपूल, रिंगरोड आणि मेट्रो मार्ग अशा प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांची मागणी अजूनच वाढली आहे. एसपी इन्फोसिटी, मगरपट्टा आयटी पार्क, झेनसार आयटी पार्क, इऑन आयटी पार्क आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर यांच्यासोबतच प्रमुख औद्योगिक स्थळांपासून हा परिसर जवळ आहे आणि त्यामुळे रिअल इस्टेटच्या वाढण्यास हातभार लागलेला आहे. सासवड जवळ असलेल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ) या परिसराच्या विकासाला आणखी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

उदयोन्मुख केंद्रांचे (हब्सचे) प्रवेशद्वार: शहरी केंद्रांपलीकडे हा महामार्ग हडपसर ॲनेक्स, उंड्री, पिसोळी, लोणी काळभोर आणि दौंड सारख्या उदयोन्मुख केंद्रांचे प्रवेशद्वार म्हणून काम करत आहे. या भागात झपाट्याने नागरीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास झाला असून, त्यांचे रूपांतर स्वयंपूर्ण केंद्रांमध्ये झाले आहे. मगरपट्टा, विमान नगर आणि खरडी जवळ आहेत आणि म्हणून या शहरांतील स्थावर संपदेचे मूल्य वाढले असून मालमत्तांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. घरांचे अनेक पर्याय, सुनियोजित मांडणी आणि आधुनिक सोयीसुविधांची उपलब्धता यामुळे ही शहरे आता घर खरेदीदार यांच्याकडे आकर्षित होत आहेत.

महत्त्वाकांक्षी, आलिशान (लक्झरी) आणि प्रशस्त निवासस्थाने: शहराच्या मध्यभागी आणि प्रस्थापित भागात असलेल्या रिअल इस्टेटच्या उच्च किंमतींशी तुलना केली, तर पुणे-सोलापूर महामार्गात महत्वाकांक्षी ते आलिशान पर्यंत विविध प्रकारच्या घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. यात 1, 2, 3 आणि 4 बी.एच.के अपार्टमेंट्स, व्हिला, व्हिलामेंट्स आणि डुप्लेक्स यांचा समावेश आहे. हे पर्याय अशा कुटुंबांसाठी आणि व्यक्तींसाठी आकर्षक बनतात ज्यांना जीवनशैलीत सुधारण्याची इच्छा आहे. जसजसे अधिक विकासक या क्षेत्राकडे आपले लक्ष वाढवत आहेत, तसतसे वैविध्यपूर्ण घरांचे पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि यामुळे विविध प्राधान्ये आणि बजेट यांची पूर्तता करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होतील.

गुंतवणुकीची क्षमता : पुणे-सोलापूर महामार्ग कॉरिडॉरचा सातत्यपूर्ण विकास आणि उपयोग न केली गेलेली क्षमता यामुळे छोट्या-मोठ्या, अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची आकर्षक संधी उपलब्ध झाली आहे. या मार्गावरील मालमत्तांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे आणि महामार्गालगतच्या भागात सुमारे 25-30% वाढ दिसून येत आहे. मालमत्तांची मागणी जसजशी वाढते, तसतशी भांडवल वाढीची क्षमताही वाढते आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक आकर्षक ठिकाण बनत आहे.

सोलापूर व आसपासच्या भागातून व्यावसायिक आणि स्थलांतरित झालेल्यांच्या आगमनामुळे भाड्याच्या मागणीत ही भर पडते, त्यामुळे खरेदी-विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारांना ते अनुकूल ठरते.

उदयोन्मुख व्यावसायिक केंद्र : महामार्गाजवळ वाढीव प्रमाणात झालेल्या निवासी विकासामुळे या भागात व्यावसायिक जागा निर्माण होत चालल्या आहेत. या कलमुळे अधिकाधिक व्यवसाय आणि गुंतवणूकदार आकर्षित होण्याची शक्यता आहे आणि हे या परिसराला स्वयंपूर्ण व्यावसायिक केंद्रात रूपांतरित करेल.

पायाभूत सुविधेवर आधारित विकास: विकसकांसाठी एक चुंबक

महामार्ग हा फक्त एक रस्ता नव्हे, तर तो वाढीचा एक माध्यम आहे. पुणे-सोलापूर महामार्ग कॉरिडॉरची क्षमता ओळखून विकासकांनी मोठ्या प्रमाणावर निवासी प्रकल्प आणि एकात्मिक नागरी विकासात गुंतवणूक केली आहे. समकालीन सोयीसुविधांसह दर्जेदार रिअल इस्टेट पर्यायांचा ओघ या भागाच्या क्षितिजाला नव्याने आकार देत आहे.

पुणे-सोलापूर महामार्गामुळे होणाऱ्या भविष्यातील फायद्याची शक्यता लक्षात घेता घरखरेदीदारांना गुंतवणुकीची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे. ज्याप्रमाणे इतर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विकासाचे रूपांतर भरभराटीच्या नागरी केंद्रात झाले आहे, त्याचप्रमाणे पुणे-सोलापूर महामार्ग सुद्धा धोरणात्मक  कनेक्टिव्हिटीच्या जोरावर वाटचाल करत आहे. या कॉरिडॉरची भरभराट होत असताना, भविष्यातील लाभ सुरक्षित करण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ शकणाऱ्या घर खरेदीदारांसाठी हे एक आकर्षक प्रस्ताव सादर करत आहे. परवडण्याची क्षमता, भक्कम पायाभूत सुविधा आणि आश्वासक आर्थिक शक्यता यांचा संगम असलेल्या पुणे-सोलापूर महामार्गामुळे येत्या काळात गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात परतावा मिळवून देण्यास सज्ज असलेला हा महामार्ग पुण्याच्या रिअल इस्टेट लँडस्केप मधील भविष्यातला एक हॉटस्पॉट बनला आहे.

Web Title: City to Suburbs: The Pune-Solapur highway opened the doors to subsidiary cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे