शहरात रविवारी वाढले १७४० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:36+5:302021-03-15T04:11:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात १७४० रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ८५८ रुग्णांना ...

शहरात रविवारी वाढले १७४० रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रविवारी दिवसभरात १७४० रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ८५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांतील ३५५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ११ हजार ५९० झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ७६५ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात १५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९५२ झाली आहे. पुण्याबाहेरील एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण ८५८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख १ हजार ६६१ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख १८ हजार २०३ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ११ हजार ५९० झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ९ हजार १२२ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत १२ लाख ४८ हजार ३८६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.