नागरिकांनी घ्यावा अर्थसंकल्पात सहभाग
By Admin | Updated: September 7, 2014 00:23 IST2014-09-07T00:23:03+5:302014-09-07T00:23:03+5:30
वॉर्डातील विकासकामे सुचविता यावीत, या उद्देशाने ‘अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अखेरचे चार दिवस उरले आहेत.

नागरिकांनी घ्यावा अर्थसंकल्पात सहभाग
पुणो : महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना, शहरातील नागरिकांना आपल्या प्रभागातील, तसेच वॉर्डातील विकासकामे सुचविता यावीत, या उद्देशाने ‘अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अखेरचे चार दिवस उरले आहेत. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी कामे सुचविण्यासाठी प्रशासनाकडून 1क् सप्टेंबर्पयतची मुदत देण्यात आली असून, नागरिकांनी जास्तीत जास्त कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दैनंदिन जीवनात प्रभागातील समस्यांशी अथवा सुविधांसाठी सर्वसामान्य नागरिकांचा सामना होतो. त्यामुळे या प्रभागात नेमकी कशाची गरज आहे आणि कोणते विकासकाम होणो आवश्यक आहे. ही बाब या नागरिकांना माहीत असते. ही कामे अर्थसंकल्पात समाविष्ट करून त्याद्वारे शहराच्या सुधारणांमध्ये नागरिकांचाही सहभाग असावा, या उद्देशाने 2क्क्7-क्8 मध्ये तत्कालीन आयुक्त नितीन करीर यांनी यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यासाठी प्रत्येक प्रभागास 5क् लाख रुपये या अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. या तरतुदीमधून प्रत्येक प्रभागासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांर्पयतचे एक अशी दहा कामे नागरिकांच्या सूचनांनुसार समाविष्ट करून घेतली जातात. दरम्यान, 2क्15-16 साठीच्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया लेखापाल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, नागरिकांनाही कामे सुचविण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
नागरिकांनी सुचविलेली ही कामे क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून छाननी करून ही कामे क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार
आहेत. समितीची मान्यता
घेऊन अंतिम मान्यतेसाठी ही कामे लेखापाल विभागाच्या माध्यमातून अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या मुख्यलेखापाल उल्का कळसकर यांनी सांगितले.(प्रतिनिधी)