नागरिकांनी फेरफार अदालतीचा फायदा करून घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:14 IST2021-09-07T04:14:35+5:302021-09-07T04:14:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नागरिकांचे हेलपाटे कमी करण्यासाठी महसूल प्रशासन दर महिन्याला फेरफार अदालत आयोजित करते. यामुळेच ...

नागरिकांनी फेरफार अदालतीचा फायदा करून घ्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नागरिकांचे हेलपाटे कमी करण्यासाठी महसूल प्रशासन दर महिन्याला फेरफार अदालत आयोजित करते. यामुळेच जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून एका दिवसात आपल्या नोंदी प्रमाणित करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्यात ६ सप्टेंबर २०२१ अखेर मुदत पूर्ण झालेल्या १३ हजार ७३५ नोंदी प्रलंबित असून, या नोंदी मध्ये प्रामुख्याने साध्या/वारस/तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी फेरफार अदालतमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मंडळ कार्यालयात ८ सप्टेंबर रोजी फेरफार अदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निकाली काढण्यात येणार आहे.
यामुळेच बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये ज्या कोणाच्या फेरफार नोंदी प्रलंबित आहे, अशा व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करून देण्यात येऊन आपल्या नोंदी निर्गत करून घ्याव्यात, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.