भीती न बाळगता नागरिकांनी कोरोना लस घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST2021-04-03T04:09:59+5:302021-04-03T04:09:59+5:30
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. ...

भीती न बाळगता नागरिकांनी कोरोना लस घ्यावी
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या लसीकरणाची सुरुवात बांदल यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिरूर पंचायत समितीचे सदस्य विजय रणसिंग, सरपंच महेंद्र रणसिंग, उद्योजक विजय करपे, ग्रा. पं. सदस्य सचिन चव्हाण, पोलीस पाटील किरण काळे, दादा घोरपडे, आरोग्य पर्यवेक्षिका मोनिका शेडे, आरोग्यसेविका सुवर्णा वीर, सुजाता चव्हाण, राणी रासकर, हेमलता नेवसे आदी उपस्थित होते.
या लसीकरण केंद्राचा परिसरातील गावच्या नागरिकांसह एमआयडीसीत जाणाऱ्या कामगारांना फायदा होणार असून परिसरातील वाढत्या कोरोना साथीला आळा बसण्यास मदत होणार आहे. दरम्यान निमगाव म्हाळुंगी परिसरातील नागरिकांना तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी जावे लागत होते, मात्र आता निमगाव म्हाळुंगीत कोविड लसीकरण मोहीम सुरू झाल्याने नागरिकांना प्रवासात होणारा त्रास वेळ व पैसा वाचणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
०२ रांजणगाव गणपती
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.