शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी शरीराचं डस्टबिन केलं- जगन्नाथ दीक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:40 IST

आपले आरोग्य आपल्या हाती यावर मार्गदर्शन

तळेगाव दाभाडे : जेवण फुकट कसे घालवायचे, या विचारातून आपल्या देशाच्या महिला लठ्ठ झाल्या आहेत. आपण घरातल्या डस्टबिनची काळजी करतो. शरीराचे मात्र डस्टबिन केले आहे. त्याची काळजी करत नाही. यामुळेच अनावश्यक वजन वाढते. पोटाचा घेर वाढतो. गुडघेदुखीचा, स्नायूदुखीचा त्रास उद्भवतो. चुकीच्या आहारामुळे आता लहान मुलांना टाइप -१ चा डायबेटिस होतो, तर ज्येष्ठांना टाईप- २ चा डायबेटिस होतो, असे प्रतिपादन डाएट सल्लागार डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने नगर परिषदेच्या थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळेच्या पटांगणात ‘आपले आरोग्य आपल्या हाती’ अर्थात विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विषावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक तथा संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांनी प्रास्ताविक केले. जीवनशैलीशी निगडित रोगावर जीवनशैली बदल हाच खरा उपचार असू शकतो. भूक ही बऱ्याचदा मानसिक असते. भूकेपेक्षा कमी खावे. खाण्याविषयी जागरूकता ठेवा. ४५ मिनिटांत ४.५०० ते ५ किलोमीटर चालावे. भारतातील २० टक्के लोकांना डायबेटिस आहे. बिनकामाचे इन्शुलिन निर्माण झाल्यामुळे डायबेटिस होतो. वारंवार खात राहिलात तर, इन्शुलिनची पातळी वाढेल. यामुळे दोन वेळा आणि खाणेपिणे ५५ मिनिटांत आटोपा. सहा ते आठ तास झोप घेतल्यावर दिवसातून दोन वेळा जेवताना जेवणाआधी एक तास अगोदर पाणी प्या. जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्या. गरज वाटलीच तर जेवताना घोट घोट पाणी प्या. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्या, असा सल्ला त्यांनी दिला.दिवसातून फक्त दोन वेळा जेवण करा. अवघ्या तीन महिन्यांत वजन कमी होईल. पोटाचा घेर कमी होईल. डायबेटिस दूर होईल अशी जाहीर हमी त्यांनी दिली. आपल्याकडे दोन वेळच्या जेवणाची प्रथा होती. आपणाकडे कधीही नाश्ता करण्याची पद्धत नव्हती. भगवान राम-कृष्ण नाश्ता करत असल्याचा उल्लेख पुराणात नाही. आपले पूर्वज नाश्ता करत असल्याचा कोणताही उल्लेख वेद किंवा ग्रंथात नाही. नाश्ता हा प्रकार ब्रिटिशांनी आणला. त्यांनी चहा आणला आणि फुकट वाटला. तेव्हापासून चहा-नाश्ता हा प्रकार सुरू झाला.उपाशी राहिल्याने कोणी मरत नाहीदिवसातून दोन वेळा जेवा असा उल्लेख आयुर्वेदात आहे. दोन वेळा जेवा, पुण्य मिळेल असे त्यात म्हटले आहे. कितीतरी खाण्याने जास्त लोक मरतात. पण उपाशी राहिल्याने कोणी मरत नाही. आपण ६० दिवस उपाशी राहू शकतो. आपले पूर्वज शिकार मिळायची, तेव्हाच खायचे, नाही तर उपाशी राहायचे. तुमचे आरोग्य तुमच्या हाती आहे. मानवतेच्या सेवेसाठी दिवसातून दोन वेळा जेवणाचा प्रयोग सुरू करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात आरोग्याच्या विविध समस्यांवर विनाखर्च, विनायंत्र, विना डाएटिंग उपाययोजनांबद्दल डॉ. दीक्षित यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.या वेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, वडगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, माया भेगडे, किशोर भेगडे, गणेश काकडे, दीपक हुलावळे, प्रवीण झेंडे, सुभाष जाधव, अशोक घारे, शोभा कदम, बाळासाहेब विनोदे, ज्ञानेश नवले, अंकुश आंबेकर, स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष भवरमल ओसवाल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स