शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश....आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 14:59 IST

फटाक्यांची आताषबाजी करून ही मंडळी थांबत नाहीत, तर काही ठिकाणी डिजे लावलेला असतो, तसेच, त्यांची मित्रमंडळी गल्लीबोळातून आणि मुख्य रस्त्यावरून दुचाकीचा जोरजोरात आवाज करत किंचाळत असतात. 

ठळक मुद्देबालके, ज्येष्ठांना मोठा त्रास : मध्यरात्री वाढदिवस करण्याच्या प्रकारात वाढ... तर विकृत संस्कृतीला आळा बसेल 

हडपसर : अलिकडे रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करताना फटाक्यांची आताषबाजी करण्याचे फॅड वाढीस लागले आहे. तसेच दुचाकीच्या सायलन्सरची पुंगळी करून जोरजोरात आवाज काढत वाहने उडविण्याची विकृत संस्कृती रुजू होत असल्याने समाजाचे स्वास्थ्य बिघडत आहे. या त्रासदायक प्रकारामुळे लहान बालके,ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, हृदयरुग्ण यांना ध्वनी प्रदूषणाचा प्रचंड त्रास होत असतो. मोठ्या आवाजामुळे हृदयरोगरुग्णाचा बळीही जाण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा विचित्रप्रकारे वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.हडपसर आणि परिसरात रात्रीच्या बारा वाजता फटाक्यांची आताषबाजी अनेकवेळा ऐकण्यात येते. त्यामुळे निद्रानाश होतो आणि नंतर बराच वेळ झोपही लागत नाही. त्यामुळे स्वास्थ्यावर मोठा परिणाम होतो. या प्रकाराची सकाळी चौकशी केल्यानंतर जवळच एखाद्या कार्यकर्त्यांचा दणक्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी फटाके फोडलेले असतात. फटाक्यांची आताषबाजी करून ही मंडळी थांबत नाहीत, तर काही ठिकाणी डिजे लावलेला असतो, तसेच, त्यांची मित्रमंडळी गल्लीबोळातून आणि मुख्य रस्त्यावरून दुचाकीचा जोरजोरात आवाज करत किंचाळत असतात. ...........................पोलिसांनीच कारवाई करावीरात्री-अपरात्री फटाक्यांचा आवाज आणि प्रकाशाच्या दिशेने रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी धाव घेऊन संबंधितावर गुन्हे दाखल करावेत. मात्र, आमची पोलीस यंत्रणा म्हणते आमच्याकडे कोणी तक्रार केली तरच आम्ही त्याच्या तपास करून गुन्हा दाखल करून कारवाई करतो. त्यामुळे पोलिसांनीच अशा प्रकारच्या घटनेची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे......................... तर विकृत संस्कृतीला आळा बसेल सामाजिक ऐक्याचे भान ठेवून वाढदिवस साजरा केला, तर आनंद द्विगुणित होईल. त्यासाठी गरीब, गरजू मुलांना शालेय साहित्य द्यावे, अनाथ संस्थांमध्ये फळे व कपडे वाटप करावे, केक ही खाण्याचा पदार्थ आहे. तो तोंडाला फासण्याऐवजी तो स्वत:ला खायचा नसेल, तर गरीब किंवा अनाथ संस्थांमध्ये नेऊन तेथील नागरिकांना द्यावा. आरोग्य शिबिर राबवावे, वृक्षारोपण करावे, एखाद्या गरीब व होतकरू मुलाला दत्तक घेऊन त्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली, तर समाजामध्ये चांगला संदेश जाईल. तसेच फटाक्याच्या ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळता येईल आणि विकृत संस्कृतीला आळा बसेल, असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :HadapsarहडपसरPoliceपोलिसHealthआरोग्य