भर पावसातही रक्तदानासाठी नागरिकाचा उत्साहा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:39+5:302021-07-20T04:09:39+5:30

सिंहगड रस्त्यावरील नवश्या मारुती चौकातील स्व. सतिशशेठ मिसाळ अभ्यासिका येथे शिबीराचे आयोजन केले होते. कोरोना महामारीमध्ये रक्तदानाची चवळव महाराष्ट्र ...

Citizens' enthusiasm for blood donation remains high despite heavy rains | भर पावसातही रक्तदानासाठी नागरिकाचा उत्साहा कायम

भर पावसातही रक्तदानासाठी नागरिकाचा उत्साहा कायम

सिंहगड रस्त्यावरील नवश्या मारुती चौकातील स्व. सतिशशेठ मिसाळ अभ्यासिका येथे शिबीराचे आयोजन केले होते. कोरोना महामारीमध्ये रक्तदानाची चवळव महाराष्ट्र राज्यातच थंडावली होती त्यामुळे रक्ताचातुटवडा निर्माण झाला होता त्यामुळे नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन नगरसेविका कदम यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देताना नागरिकांनी सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच रक्तदानासाठी गर्दी केली. सकाळी दहापासून मुसळधार पाऊस सुरु असतानाही दुसरीकडे रक्तदान सुरुच राहिले दुपारी चार पर्यंत रक्तदात्यांच्या आकड्याने हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

शिबीराचे आयोजन संतोष कदम यांच्या सोबत लक्ष्मीकांत त्रिवेदी, अभिजीत घोणे, सचिन घोणे, मकरदं केळकर, कैलास कदम, मयुर सोनावणे, गणेश गाडे, आमोल भास्कर, नारायण गोरड, अनिल शिंदे, अनिल सुर्यवंशी, भुषण कुलकर्णी, प्रितम फासगे, परीतोष मोहीते, शुभम पार्टे, अथर्व कदम, निखिल पालकर, प्रशांत माने, हर्षवर्धन शिंदे, निरज रासकर, शिवम यादव, योगेश लोढें, प्रकाश माने यांनी केले.

--

फोटो क्रमांक :१९ पुऐ ब्लड डोनेशन

फोटो ओळ : रक्तदान शिबीरावेळी उपस्थित नगरसेविका अनिता संतोष कदम व प्रभागातील कार्यकर्ते पदाधिकारी.

Web Title: Citizens' enthusiasm for blood donation remains high despite heavy rains