शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाने "होम क्वारंटाईन" होण्याची नागरिकांची मागणी; लॉकडाऊन काळात गायब असल्याचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 20:01 IST

नागरिकांचा रोष पाहताच संबंधित नगरसेवकाने करुन घेतली स्वत:ची कोरोनाची चाचणी

ठळक मुद्देयाप्रकरणी महापौरांनी यामध्ये लक्ष घालण्याची केली विनंती

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केल्यापासून आपल्या प्रभागातून गायब झालेला नगरसेवक थेट 11 मे रोजीच दिसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या नगरसेवकाने तात्काळ कोरोना तपासणी करुन '' होम क्वारंटाईन'' व्हावे अशी मागणी करीत महापौरांनी यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. नागरिकांचा रोष पाहताच संबंधित नगरसेवकाने पालिकेच्या दवाखान्यात जाऊन मंगळवारी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घेतली.प्रभाग क्रमांक तीन या भागातील सामाजिक कार्यकर्ते विकी औरंगे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी याविषयी आक्षेप घेतला. औरंगे यांनी सांगितले, की या भागातील नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी हे जनता कर्फ्यू लागल्यानंतर परिवारासह बाहेरगावी गेले होते. ते सोमवारी घरी परत आले. ते नेमके कुठे होते, कोणा कोणाच्या संपर्कात आले याची काहीही माहिती लोकांना नाही. पालिका प्रशासनाने याची माहिती घेणे आवश्यक आहे. त्यांनी स्वत:ची तपासणी करुन घेण्याची आवश्यकता आहे. वास्तविक, नागरिकांच्या आणि मतदारांच्या अडचणी समजून घ्यायला आणि याकाळात त्यांना मदत करायला ते महिनाभर उपलब्ध झाले नाहीत. ज्या मतदारांच्या जोरावर ते नगरसेवक झाले त्याच नागरिकांना त्यांनी वा-यावर सोडले असे औरंगे म्हणाले.यासंदर्भात नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, त्यांची तब्येत फेब्रुवारीपासून बरी नाही. त्यांनी अनेक उपचार घेतले परंतू त्याचा विशेष परिणाम दिसून आला नाही. आयुर्वेदिक उपचार घेण्याकरिता ते हवेली तालुक्यातील एका गावामध्ये गेले होते. या उपचारांकरिता वैद्याकडेच राहणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे एवढे दिवस उपचारांसाठी राहावे लागले. आपले कुटुंब गावी शेतावर राहाते आहे. पालिकेच्या गलांडे रुग्णालयात कोरोनाची तपासणी करुन घेतल्री आहे. मी घरामध्येच राहात असून कुठेही बाहेर जात नसल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या आजारपणाचे केवळ राजकारण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरMNSमनसे