सरपटणा:या प्राण्यांचे राज्यातील पहिले संग्रहालय
By Admin | Updated: September 17, 2014 00:39 IST2014-09-17T00:39:26+5:302014-09-17T00:39:26+5:30
निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे लवकरच नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार केला

सरपटणा:या प्राण्यांचे राज्यातील पहिले संग्रहालय
पिंपरी : निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे लवकरच नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार केला असून, बिबटे, माकड आदी प्राणी अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहेत. या प्राणिसंग्रहालयाचे स्वरूप बदलणार असून, जलचर, सरपटणारे प्राणी आणि पक्षी हे या प्राणिसंग्रहालयात पहावयास मिळतील. हे सरपटणा:या प्राण्यांचे राज्यातील पहिले संग्रहालय ठरेल असा दावा करण्यात येत आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, पर्यावरण मंत्रलयाने पालिकेच्या प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणास मान्यता दिली आहे. पश्चिम घाटाची भौगोलिक स्थिती, अस्तित्वातील प्राणी, पक्षी संवर्गाचा विचार करून या प्राणिसंग्रहालयात सरपटणारे प्राणी, जलचर, पक्षी ठेवण्यास मान्यता दिली आहे. ज्यामध्ये किंग कोब्रा, अॅनाकोंडा अशा दुर्मिळ प्रजातींचा समावेश करण्यात आलेला आहे. हे प्राणिसंग्रहालय लहान स्वरूपातील प्राणिसंग्रहालय मानले जाते.
पालिकेने नेमलेल्या वास्तुविशारद व तांत्रिक सल्लागारांनी नव्या प्राणिसंग्रहालयाचा आराखडा तयार केला आहे. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य, उद्यान विभागाचे अभियंता संजय कांबळे यांनी या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. (प्रतिनिधी)
नियोजनानुसार लवकरच नूतनीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात त्यास 4क् लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सुमारे सात एकर जागेवर हे प्राणिसंग्रहालय विकसित करण्यात येणार आहे.
किंग कोब्रासह अन्य साप काचेच्या बंद पेटीत ठेवण्यात आले आहेत. सर्पोद्यान म्हणून ओळख असलेल्या या उद्यानातील सर्पकुंड आता रिकामे आहे. पक्ष्यांची संख्याही कमी आहे.
सरपटणा:या प्राण्यांसाठीचे संग्रहालय म्हणून राज्यातील हे पहिलेच संग्रहालय असेल, असा दावा महापालिका अधिका:यांनी केला आहे.