सिगारेटच्या वादातून सराईत गुन्हेगाराकडून मालकावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:15 IST2021-05-05T04:15:53+5:302021-05-05T04:15:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सिगारेट आणून न दिल्याने सराईत गुन्हेगाराने कामगारांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्याचा जाब ...

Cigarette dispute leads owner to attack owner | सिगारेटच्या वादातून सराईत गुन्हेगाराकडून मालकावर वार

सिगारेटच्या वादातून सराईत गुन्हेगाराकडून मालकावर वार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सिगारेट आणून न दिल्याने सराईत गुन्हेगाराने कामगारांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मालकावर दोघा सराईत गुन्हेगारांनी कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला. ही घटना दांडेकर पुलाजवळील सार्वजनिक शौचालयासमोर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली.

याप्रकरणी ओम सुरवसे (वय २१) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी जितेंद्र कदम, अनिल कदम, मयूर कदम, आकाश ऊर्फ गिरी पोपट सोनवणे (सर्व रा. दांडेकर पूल) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ओम सुरवसे यांचा घोड्यांचा व्यवसाय आहे. सारसबागेजवळ मुलांना घोड्यांना बसवून व्यवसाय केला जातो. त्यांच्याकडे दोन कामगार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कामगारांनी सिगारेट आणून न दिल्याचे कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्याचा जाब सुरवसे यांनी विचारला होता. त्या वेळी त्यांच्यात भांडणे झाली होती.

रविवारी सकाळी साडेनऊ वाजता ओम हे शौचालयात जात असताना दोघांनी अडविले. याला आज जिवंत सोडायचा नाही, असे म्हणून शिवीगाळ करीत कोयत्याने वार केला. आजूबाजूला जमलेल्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी लोकांना सुटा येथूऩ आमच्या नादी लागला तर सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे नागरिक पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक विक्रम पवार अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Cigarette dispute leads owner to attack owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.