दागिने चोरणारा सीसीटीव्हीत कैद

By Admin | Updated: January 22, 2016 01:31 IST2016-01-22T01:31:37+5:302016-01-22T01:31:37+5:30

येथील सुंदर संकुलमध्ये भर दिवसा सोन्याचे दागिने चोरी करणारा चोरटा स्ीासीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

Cigarette captive with jewelery seizure | दागिने चोरणारा सीसीटीव्हीत कैद

दागिने चोरणारा सीसीटीव्हीत कैद

तळेगाव ढमढेरे : येथील सुंदर संकुलमध्ये भर दिवसा सोन्याचे दागिने चोरी करणारा चोरटा स्ीासीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ज्ञानवर्धिनी विद्यालयासमोरील सुंदर संकुलमध्ये चौथ्या मजल्यावर राहणारे समर रावळ यांच्या बंद
घराचे कुलूप तोडून साधारण
३ ते ४ तोळे सोन्याचे दागिने
चोरट्याने आज भर दिवसा सकाळी ११ ते ११.४५ वा. दरम्यान चोरून पलायन केले. मात्र, या वेळी इमारतीच्या जिन्यावरून जात असताना
चोरटा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
याबाबत समर रावळ यांनी तळेगाव ढमढेरे पोलीस चौकीला फिर्याद दिली आहे. तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर परिसरात फोटोतील सदर व्यक्ती आढळल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस हवालदार शशिकांत बंड यांनी
केले आहे.
तळेगाव ढमढेरे परिसरात
भुरट्या चोरांच्या प्रमाणात वाढ
झाली असून, दोनच दिवसांपूर्वी एस.टी. स्टँड चौकात दुकाने
फोडून चोरी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
तळेगाव ढमढेरे परिसरात वाढत्या शहरीकारणामुळे चोऱ्यांच्या प्रमाणातही वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लॅटसंस्कृतीही वाढल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
(वार्ताहर)

Web Title: Cigarette captive with jewelery seizure