शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नाताळनिमित्त प्लम, मार्झीपॅन अन् ग्वाआ चीजकेकला विशेष पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 19:46 IST

खास नाताळानिमित्त तयार करण्यात आलेल्या प्लम केक, मार्झीपॅन केक आणि ग्वाआ चीजकेकला ख्रिश्चन बांधवांची विशेष पसंती मिळत आहे.

ठळक मुद्देनाताळासाठी विशेष मागणी असलेल्या प्लम केकमध्ये आढळतात अनेक प्रकार ग्वाआ चीज हा जास्त लोकप्रिय प्रकार, घ्यावी लागते मेहनत

पुणे : प्रभू येशूचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे केक उपलब्ध झाले आहे. खास नाताळानिमित्त तयार करण्यात आलेल्या प्लम केक, मार्झीपॅन केक आणि ग्वाआ चीजकेकला ख्रिश्चन बांधवांची विशेष पसंती मिळत आहे. गत वर्षांच्या तुलनेत केकच्या मागणीमध्ये यंदा दुप्पट वाढ होणार आहे.ख्रिश्चन बांधवांची आवड निवड लक्षात घेऊन खास नाताळासाठी मागणीनुसार विशिष्ट प्रकारचे विविध केक तयार करण्यात येतात. यामध्ये प्लम केक, मार्झीपॅन केक, ग्वाआ चीजकेकसह सांताक्लॉजची प्रतिकृती, ख्रिसमस ट्री तसेच फ्रेश क्रीम, चॉकलेट ब्राउनी केक, प्लम हनी केक, मिक्स फ्रूट केक, रिअल प्लम, रीच प्लम, स्टार केक, स्टोलन ब्रेडआदींनाही विशेष मागणी राहते. सद्यस्थितीत ब्लॅक फॉरेस्ट केक, मिक्स फ्रूट, वेडिंग, चॉकलेट मड, निव्हर्सरी, थीम केक यांसारखे शंभरावर केकचे प्रकार आॅर्डरनुसार बनवून मिळतात. त्यांची किंमत आकर्षक फ्लेवर्स, वजन तसेच डिझाईननुसार ठरते. ख्रिसमससाठी २७० रुपयांपासून केक उपलब्ध असून प्लमकेकची १ हजार ते १ हजार २०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्यात येत आहे. याखेरीज, शुद्ध शाकाहारींसाठी अंड्याचा वापर न करता तयार केलेले केकही बेकऱ्यांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती विक्रेते अजिंक्य कोळेकर यांनी दिली. खास ख्रिसमससाठी सान्ताक्लॉज, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल अशा स्वरुपामध्ये ही चॉकलेट्स तयार करण्यात आली आहेत. याबरोबरच काही दुकानांमध्ये होम मेड चॉकलेट्सही उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.     नाताळासाठी विशेष मागणी असलेल्या प्लम केकमध्ये अनेक प्रकार आढळतात. हा ड्राय केक असून तीन महिन्यांआधी तो रममध्ये भिजवला जातो. रिच प्लम केक हा पूर्णपणे सुक्यामेव्यापासून तयार करण्यात येतो. काजू, किसमिस, अक्रोड, टूटी फ्रुटी यांचा त्यामध्ये भरपूर वापर होतो. संत्र्याचे साल साखरेच्या पाकामध्ये उकळून ते या केकवर बसवले जाते, त्यामुळे केकला वेगळीच चव येते. मार्झीपॅन केक हा नाताळसाठी तयार करण्यात येत असलेला दुसरा महत्त्वाचा प्रकार. त्यातही प्रामुख्याने सुक्यामेव्याचा वापर होतो. त्यात प्रामुख्याने बदामाची पेस्ट आणि साखरेचा पाक असतो. या केकला वेगवेगळ्या प्रकारची चव यावी यासाठी आंबा, स्ट्रॉबेरी, पेरू, कैरी, जांभूळ यांच्या रसाचा वापर करण्यात येतो. ग्वाआ चीज हा जास्त लोकप्रिय प्रकार आहे. हा केक तयार करताना पेरू साखरेच्या पाकात उकळून तयार केलेल्या जेलीचा वापर करण्यात येतो. यासाठी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे नाताळ आणि ईस्टर या सणांच्या वेळीच हा केक तयार करण्यात येत असल्याचे विक्रेते महेश जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :ChristmasनाताळPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड