कपबशी, नारळाला अपक्षांची पसंती

By Admin | Updated: February 9, 2017 03:28 IST2017-02-09T03:28:49+5:302017-02-09T03:28:49+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आज चिन्ह वाटप करण्यात आले. त्यात पक्षाचे अधिकृत पंजा, घड्याळ, कमळ,

The choice of kapabashi, coconut, and cigarettes | कपबशी, नारळाला अपक्षांची पसंती

कपबशी, नारळाला अपक्षांची पसंती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आज चिन्ह वाटप करण्यात आले. त्यात पक्षाचे अधिकृत पंजा, घड्याळ, कमळ, धनुष्यबान, इंजिन या अधिकृत चिन्हांसह अपक्षांनी कपबशी आणि नारळ या चिन्हास पसंती देण्यात आली.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर बुधवारी सकाळपासून चिन्ह वाटपाचे काम शहरातील अकरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाले. पक्षांचे अधिकृत चिन्ह सोडून इतर उमेदवारांना पसंती क्रमानुसार चिन्हे देण्यात येत होती. तर अपक्ष उमेदवार पॅनेल करण्याच्या दृष्टीने एकच चिन्ह मिळावे, यासाठी उमेदवार प्रयत्नशील होते. यापूर्वी अपक्ष उमेदवारांनी त्यात कपबशी, नारळ चिन्हांवर परिवर्तन घडवून आणले आहे. त्यामुळे परिवर्तनाचे चिन्ह म्हणजेच संबंधित दोन चिन्हे अशी धारणा झाली होती. त्यामुळे या दोन चिन्हांना अधिक पसंती दिली. त्याचबरोबर शिट्टी, नारळ, रोडरोलर, बॅट, टिव्ही, पंतग, टॉर्च अशा विविध चिन्हांनाही पसंती दिली.
राष्ट्रवादीने १२६ उमेदवार जाहीर केले होते. त्यापैकी १२४ उमेदवारच निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. भाजपाचे १२५ उमेदवार चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. तीन पुरस्कृत आहेत. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे ११९, तर काँग्रेसने ७० उमेदवार दिले होते. त्यापैकी ५९ रिंगणात उरले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The choice of kapabashi, coconut, and cigarettes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.