पिरंगुटला सोन्याचे दुकान फोडले
By Admin | Updated: February 8, 2016 02:12 IST2016-02-08T02:12:23+5:302016-02-08T02:12:23+5:30
पिरंगुट (ता. मुळशी) येथील बसथांबा परिसरात असलेले नागनेश्वर ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान (ता. ६) रोजी रात्री २ च्या सुमारास फोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख २१ हजारांची रक्कम असा सुमारे

पिरंगुटला सोन्याचे दुकान फोडले
पौड : पिरंगुट (ता. मुळशी) येथील बसथांबा परिसरात असलेले नागनेश्वर ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान (ता. ६) रोजी रात्री २ च्या सुमारास फोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोख २१ हजारांची रक्कम असा सुमारे
५ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
पिरंगुट बसथांबा परिसरात राठोड बंधू यांचे नागनेश्वर ज्वेलर्स नावाने मागील १५ वर्षांपासून सोन्या-चांदीचे दागिने बनविणे व विकण्याचा व्यवसाय आहे. या दुकानाचा पत्रावरील बाजूने कापून चोरट्यांनी अत्यंत शिताफीने दोरीच्या साह्याने खाली उतरून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर चतुराईने सीसीटीव्ही कॅमेरे वायर कापून बंद केले.
दुकानाच्या मागील बाजूस असलेली लोखंडी तिजोरी गॅस कटरच्या साह्याने खोलून त्यातील १६ तोळे सोने, २ कि. चांदीचे दागिने, तसेच २१ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. सदर दुकान पुणे-पौड रस्त्यावर अत्यंत वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर असूनही चोरांनी वरील बाजूचा पत्रा कापून आत प्रवेश केलेला असल्याने ही चोरी सराईत व माहीतगार चोराने केली असावी, असा संशय आहे.
विशेष म्हणजे हेच दुकान यापूर्वी दोन वेळा फोडलेले असल्याने दुकानाचे मालक राठोड पुरते धास्तावले आहेत. दुकानाचे मालक राठोड दररोजप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असताना सदर घटना घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी घटनेची
खबर पिरंगुट पोलीस चौकीला
दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीचे
फुटेज तपासले असून, त्यात तोंड रुमालाने बांधलेले दोन चोरटे कॅमेऱ्याची वायर कापण्यापूर्वी दिसून येत आहेत.
घटनास्थळी पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक विवेक पानसरे, स्थानिक गुन्हे तपास पथकाचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.
(वार्ताहर)