मॅगीपेक्षाही चायनीज घातक!
By Admin | Updated: June 8, 2015 05:14 IST2015-06-08T05:14:09+5:302015-06-08T05:14:09+5:30
चायनीज विक्रेत्यांकडून मॅगीपेक्षा अनेक पटींनी जास्त मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) चायनीज पदार्थांमध्ये सर्रास वापरले जात आहेत.

मॅगीपेक्षाही चायनीज घातक!
दीपक जाधव, पुणे
चायनीज विक्रेत्यांकडून मॅगीपेक्षा अनेक पटींनी जास्त मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) चायनीज पदार्थांमध्ये सर्रास वापरले जात आहेत. त्यामुळे ते जास्त सेवनाने शरीराला घातक ठरू शकते.
‘मॅगी’मध्ये एमएसजी आणि शिसे यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्याने इतर राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही मॅगीवर बंदी घालण्यात आली आहे. एमएसजीला व्यवहारात अजिनो मोटो असे म्हटले जाते. चाजनीज पदार्थांमध्येही मोठया प्रमाणात अजिनो मोटोचा वापर केला जातो. अजिनो मोटा हा अन्नाची चव आणि रंग कृत्रिमरित्या वाढवितो. यामुळे अन्नपदार्थ खुलतात व आर्कषक दिसतात. दहा व्यक्तिंच्या अन्नपदार्थामध्ये अगदी चिमुटभर अजिनो मोटो पुरेसा असतो. मात्र चाजनीज विक्रेते भरमसाठ प्रमाणात अजिनोमोटो वापर करतात. या पदार्थांमुळे सतत चाजनीज पदार्थ खावेसे वाटू लागतात. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमन २०११’ मध्ये एमएसजी हा पदार्थ वापरल्याने होणाऱ्या दुष्परिणामाबाबत उल्लेख नाही असे उत्तर देण्यात आले आहे. (वार्ताहर)
एमएसजी हे अॅमिनो अॅसिड आहे. यामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण वाढून रक्तदाब, हृदयविकार होतात. तसेच मूत्रपिंड व यकृतांवर त्याचा परिणाम होतो. तसेच शिशांमुळे भुक मंदावते, रक्तामध्ये त्याचे प्रमाण वाढल्याने विषबाधा होऊ शकते. हाडांवरही परिणाम होतो.
डॉ. अविनाश भोंडवे
चायनीज विक्रेत्यांकडील पदार्थांचे नमुने
घेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे, तसेच एफडीएचा परवाना न घेता व्यवसाय करणाऱ्या चायनीज विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.
- शशिकांत केकरे, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग
दहा व्यक्तींच्या अन्नपदार्थामध्ये अगदी चिमूटभर अजिनोमोटो पुरेसा असतो. मात्र चाजनीज विक्रेते भरमसाट प्रमाणात अजिनोमोटो वापर करतात.
पुण्यात केवळ १२ जणांनीच एफडीएकडून परवाना घेतला आहे. तसेच गेल्या ३ वर्षात एकाही चाजनीज विक्रेत्याची एफडीएकडून तपासणी करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.