जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ चिंचवड
By Admin | Updated: August 6, 2014 23:08 IST2014-08-06T23:08:25+5:302014-08-06T23:08:25+5:30
जिल्ह्यातील मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून, मतदारांच्या संख्येनुसार चिंचवड जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ ठरला असून, दौंड मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वात कमी आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ चिंचवड
>पुणो : जिल्ह्यातील मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून, मतदारांच्या संख्येनुसार चिंचवड जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ ठरला असून, दौंड मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वात कमी आहे.
पुणो शहरात खडकवासला मतदारसंघ सर्वांत मोठा असून,
कसबा लहान मतदारसंघ ठरला
आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 68 लाख 59 हजार 614
झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने नुकतीच मतदार यादी प्रसिद्ध केली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर ही यादी उपलब्ध आहे.
मतदार नाव नोंदणी मोहिमेंतर्गत सुमारे तीन लाख नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 4 लाख 83 हजार मतदार असून, त्या खालोखाल खडकवासला मतदारसंघात 4 लाख 2क् हजार मतदार आहेत.
जिल्ह्यामध्ये भोर, पिंपरी, भोसरी, वडगावशेरी, कोथरुड, पर्वती आणि हडपसर मतदारसंघात तीन लाखापेक्षा अधिक मतदार आहेत.
गेल्या महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेनंतरही मतदारांना नाव नोंदणीची संधी
आहे. ऑगस्टपासून पुन्हा नाव
नोंदणी सुरू करण्यात आली
असून, कोणा मतदाराचे नाव मतदारयादीतून वगळले गेले असेल, तर त्यांनी योग्य पुराव्यासह मतदार अर्ज सादर करावा. त्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)
जुन्नर - 2,73,384
आंबेगाव -2,68,क्15
खेड-आळंदी - 2,81,क्61
शिरूर - 3,क्8,872
दौंड -2,67,334
इंदापूर - 2,72,274
बारामती - 3,क्5,662
पुरंदर - 2,93,क्75
भोर - 3,16,148
मावळ -2,88,621
चिंचवड - 4,83,114
पिंपरी -3,79,39क्
भोसरी -3,57,654
वडगावशेरी - 3,99,6क्3
शिवाजीनगर - 2,82,क्5क्
कोथरुड - 3,46,169
खडकवासला -4,2क्,235
पर्वती - 3,38,क्1क्
हडपसर - 4,13,242
पुणो कॅन्टोन्मेंट -2,9क्,619
कसबा पेठ -2,74,762