मिरची, टोमॅटो, फ्लॉवरची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:18 AM2018-08-20T01:18:42+5:302018-08-20T01:18:59+5:30

कांदा, बटाट्याची आवक वाढून भाव घटले, चाकण बाजारात ४ कोटी ९० लाख रुपयांची उलाढाल

Chillies, tomatoes, flower increased inward | मिरची, टोमॅटो, फ्लॉवरची आवक वाढली

मिरची, टोमॅटो, फ्लॉवरची आवक वाढली

googlenewsNext

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरची आवक वाढली. मात्र, पावसामुळे भाज्यांच्या किमती उतरल्या. कांद्याची आवक वाढून भाव २१ रुपयांनी घटले. बटाटा आवक ९८२ क्विंटलने वाढली. भाव स्थिर राहिले. शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात बकरी ईदच्या सणामुळे विक्रीसाठी ३५०० बोकडांची आवक झाली. त्यापैकी २५०० बोकडांची उच्चांकी विक्री होऊन बोकड बाजारात तीन कोटींची उलाढाल झाली. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच बोकडांचा बाजार सकाळी ६ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत चालू होता. बोकडांच्या विक्रीतून बाजार समितीला तीन लाखांचे उत्पन्न झाले असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ७६० क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव १२३० रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक २७८२ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९८२ क्विंटलने वाढली. बटाट्याचा कमाल भाव १७०० रुपये झाला. या सप्ताहात भुईमूग शेंगांची आवक २० पोती झाली. लसणाची एकूण आवक २० क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव २ हजार ५०० रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ४२५ पोती झाली. मिरचीचा भाव ३००० रुपयांवर स्थिर झाला.
राजगुरुनगर येथील मुख्य बाजारात मेथीची ४,१५००० जुड्यांची आवक होऊन २०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर ३ लाख ८५ हजार जुड्यांची आवक होऊन १०१ ते ५०० रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक ७०००० जुड्या झाली. २०१ ते ४०० रुपये असा जुड्यांना भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव रुपयांत असे :
कांदा - एकूण आवक - ७६० क्विंटल. भाव क्रमांक १ : १२३०, भाव क्रमांक : ९५०, भाव क्रमांक ३ : ६००. बटाटा - एकूण आवक - २७८२ क्विंटल. भाव क्रमांक १ : १७००, भाव क्रमांक २ : १५००, भाव क्रमांक ३ : १२००. लसूण - एकूण आवक - २० क्विंटल. भाव क्रमांक १ : २५००, भाव क्रमांक २ : २०००, भाव क्रमांक ३ : १८००. भुईमूग शेंग आवक २० क्विंटल, भाव क्रमांक १ : ५३००, भाव क्रमांक २ : ४०००, भाव क्रमांक ३ : ४५००.

पालेभाज्या :
पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव रुपयांत असे :
मेथी - एकूण १७४५० जुड्या (२०० ते ५००), कोथिंबीर - एकूण २३९०० जुड्या (२०० ते ४००), शेपू - एकूण ८४७० जुड्या (२०० ते ४००), पालक - एकूण ५८४० जुड्या (२०० ते ३००).

फळभाज्या :
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रति १० किलोसाठी डागांना मिळालेले भाव रुपयांत असे :
टोमॅटो - ११४० पेट्या (६०० ते १४००), कोबी - ३२० पोती (५०० ते १०००), फ्लॉवर - ४५० पोती (५०० ते ८००), वांगी - ६१५ - पोती (१००० ते २०००), भेंडी - ५४५ पोती (१५०० ते २५००), दोडका - २८६ पोती (२००० ते ३०००), कारली - ४६९ डाग (१५०० ते २५००), दुधी भोपळा - २३५ पोती (५०० ते १०००), काकडी - ३४५ पोती (५०० ते १२००), फरशी - १५० पोती (१००० ते २०००), वालवड - ३८५ पोती
(१५०० ते ३५००), गवार - २९० पोती (२००० ते ३०००), ढोबळी मिरची - ३९० डाग (१५०० ते २५००),
चवळी - १४२ पोती (१००० ते २०००), शेवगा - ९५ डाग (३५०० ते ४५००).

Web Title: Chillies, tomatoes, flower increased inward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.