शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बालकाला अजुनही प्रतिक्षा आई वडिलांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 20:55 IST

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे सापडलेले नवजात बालक ६ महिन्यांपासुन त्याच्या आई वडीलांच्या प्रतिक्षेत आहे.

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव येथे सापडलेले नवजात बालक ६ महिन्यांपासुन त्याच्या आई वडीलांच्या प्रतिक्षेत आहे.आजही त्याची प्रतिक्षा थांबलेली नाही.जन्मल्यापासूनच त्याच्या  नशिबी बेवारशीपणाचे जगणे आले आहे. यासंदर्भात अज्ञात माता पित्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुष जातीचे हे बालक  १४ डिसेंबर २०१८ रोजी अवघ्या तीन चार दिवसांचे असताना सापडले. स्थानिक नागरीकांनी येथील नगरसेविका रुपाली गायकवाड यांचे पती दिपक गायकवाड यांना या बेवारस रडणाऱ्या बाळाची माहिती दिली. गायकवाड यांनी पोलीसांना या बाबत दिलेल्या माहितीवरुन तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी पोचले. त्यानंतर शहर पोलीसांनी आजुबाजुला चौकशी करुन तत्काळ अर्भकाला ताब्यात घेवून प्राथमिक उपचारासाठी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुन्हा अर्भक पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी महिला पोलीस कर्मचारी प्रेमा सोनवणे यांनी त्या बाळाला आईच्या प्रेमाची ऊब दिली. जागरुक नागरीकांसह पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे या नवजात अर्भकाला खऱ्या अर्थाने जीवदान मिळाले.

शहर पोलीस ठाण्याचे धुमाळ यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत मातापित्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न  केला. मात्र, पोलीसांच्या प्रयत्नाला यश आले नाही. शेवटी पोलीसांनी अर्भकास ताब्यात घेवुन पुणे येथील बाल कल्याण समितीला कळविले. त्यानंतर समितीच्या आदेशाने हे अर्भक  केडगांव (ता. दौंड) येथील पंडीता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेत तात्पुरत्या संरक्षणासाठी ठेवण्यात आले आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसांचे हे अर्भक आता सहा महिन्यांचे गोंडस बालक झाले आहे. त्याचे नाव संस्थेने ‘अभिषेक’ ठेवले आहे. त्यामुळे बालकाच्या नातेवाईकांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या सोशल वर्कर छाया म्हंकाळे यांनी केले आहे.अद्याप त्या निष्पाप बालकाला त्याच्या आई वडीलांची प्रतिक्षा आहे.

... अज्ञात मातापित्यांची निष्ठुरता उघडनवजात अर्भकाचा कडाक्याच्या थंडीपासुन बचाव होण्यासाठी  उघड्यावर सोडुन जाणाऱ्या अज्ञात मातापित्यांनी चांगलीच दक्षता घेतली होती. मखमली कापडात गुंडाळलेल्या बाळाला स्वेटर घालण्यात आला होता. त्यानंतर ‘लव्ह’ लिहिलेल्या उबदार लोकरसदृश्य कापडात  बाळाला लोकरी कानटोपीसह  गुंडाळुन ठेवले होते. अर्भकाजवळ दुधाने भरलेली बाटली देखील ठेवली होती. मात्र,अर्भकाला उघड्यावर बेवारसपणे सोडुन दिले. सहा महिन्यानंतर देखील त्या बालकाकडे दुर्लक्ष केल्याने अज्ञात मातापित्यांची निष्ठुरता उघड झाली आहे. अज्ञात आरोपी माता पिता यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेPoliceपोलिस