जेजुरी : बेलसर येथील कृष्णाबाई यशवंत जगताप (वय ७५) यांचा त्यांच्या मुलाने डोक्यावर कुऱ्हाडीचा वार करून खून केला. ही घटना बेलसर गावातील नारळीचा मळा येथे सकाळी नऊ वाजता घडली.विजय यशवंत जगताप (वय ५३, रा. बेलसर, ता. पुरंदर) याला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विजय हा आई-वडिलांकडे ‘जमीन व घर माझ्या नावावर करून द्या,’ अशी वारंवार मागणी करीत होता. आई व वडील त्याला तयार होत नसल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते. आज सकाळी नऊ वाजता आरोपी विजयने वडील नसताना आईकडे या जमीन व घराचा विषय काढला. यावरून त्यांच्यात जोराचा वाद झाला. रागाच्या भरात आईच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला. खोलवर गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्या. या संदर्भातील फिर्याद वडील यशवंत दत्तात्रय जगताप (वय ८४) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली. आरोपी विजयला अटक केली आहे.
मुलानेच केला आईचा खून
By admin | Updated: July 9, 2015 04:42 IST