बालकाचा अपघातात मृत्यू

By Admin | Updated: April 29, 2017 03:57 IST2017-04-29T03:57:33+5:302017-04-29T03:57:33+5:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका पेट्रोल पंपासमोर बंद पडलेल्या उभ्या ट्रकला

Child accident death | बालकाचा अपघातात मृत्यू

बालकाचा अपघातात मृत्यू

उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका पेट्रोल पंपासमोर बंद पडलेल्या उभ्या ट्रकला ओमनी व्हॅनने पाठीमागून धडक दिली. यात एका दहा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सिंधी जवळगा येथून ओमनी व्हॅनने सहा प्रवासी पुण्याकडे निघाले होते. व्हॅन सोरतापवाडी हद्दीतून पुण्याकडे जात असताना महामार्गावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच १२, केपी २०९६) ओमनी व्हॅनने (एमएच २४, व्ही ५७०३) पाठीमागून जोरदार धडक दिली. व्हॅनमधील मुकेश महादेव पिरसले (वय १०, रा. सिंधी जवळगा, ता. निलंगा, जि. लातूर) या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तानाजी रघुनाथ जाधव (वय ५१), पद्मिनी तानाजी जाधव (वय ४८), शोभा सूर्यकांत धुमाळ (वय ३८), मोहन राजेंद्र मगर (वय ५५), सतीश दामोदर म्हाळुंगे (वय ३७) या पाच जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंह परदेशी हे करीत आहे.

Web Title: Child accident death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.