शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

धक्कादायक ! भेटवस्तूत आले कोंबडीचे मुंडके, माथेफिरूचा कारनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:43 IST

पिंपळे गुरव येथील महाराष्ट्र कॉलनीत जयकुमार भुजबळ वडील मधुकर भुजबळ तसेच आई विमल भुजबळ यांच्याबरोबर राहतात. एका माथेफिरूकडून त्यांना वेगळ्या पद्धतीने मानसिक त्रास दिला जात आहे.

ठळक मुद्देमाथेफिरूच्या कारनाम्याने भुजबळ कुटुंबीय भयभीत माथेफिरू त्यांना ओळखणाऱ्यांपैकी असावा असा अंदाज

पिंपरी : वाढदिवसाच्या आदल्या दिवशी घराच्या आवारात कोणीतरी एक प्लॅस्टिक डबा ठेवतो...डब्यात वरच्या बाजुस खेळाच्या पत्यातील जोकरचे चित्र...जवळच कागदात गुंडाळलेले रक्ताने माखलेले कोंबडीचे मुंडके... हे दृश्य पाहुन जयकुमार भुजबळ हादरून गेले. उद्या वाढदिवस व आदल्या दिवशीच असा काही प्रकार घडल्याने भयभीत झालेल्या जयकुमारने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांच्या मोटारीच्या दर्शनी भागावर काळा रंग फासून विद्रुपीकरण करण्यात आल्याचे दिसून आले. या विकृत व्यक्तीने काळ्याने सुरूवात केली आहे, लाल रंगाने शेवट होईल. अशी धमकीच त्याने बनावट फेसबुक अकाउंट दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून भुजबळ कुटुंबीयांमध्ये असुरक्षितता निर्माण झाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. 

पिंपळे गुरव येथील महाराष्ट्र कॉलनीत जयकुमार भुजबळ वडील मधुकर भुजबळ तसेच आई विमल भुजबळ यांच्याबरोबर राहतात. एका माथेफिरूकडून त्यांना वेगळ्या पद्धतीने मानसिक त्रास दिला जात आहे. दीड महिन्यांपासून हा त्रास सुरू असून माथेफिरूच्या कृत्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांनी याची गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडे तक्रार दिली आहे. फेसबुक, इस्टाग्रामवर बनावट खाती उघडून हा माथेफिरू जयकुमार भुजबळ यांना उद्देशून वेगवेगळ्या पोस्ट करू लागला आहे. अश्लील, धमकावणारा मजकूर तसेच काही विचित्र छायाचित्र पाठवुन जयकुमार यांना सतावले जात आहे. जयकुमार यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी माथेफिरूने भेटवस्तूच्या डब्यात एकच जोकरचे चित्र असलेला पत्ता ठेवला होता. दुस-या दिवशी जोकरचा पत्ता वगळता, अन्य पत्ते त्याने त्यांच्या मोटारीजवळ टाकले.

जयकुमार पिंपळे गुरवला राहतात. परंतु, कामानिमित्त ते रोज चिंचवडला जातात. त्यांच्यावर पाळत ठेवून माथेफिरूने चिंचवड येथे जावून जयकुमार यांच्या मोटारीवर दर्शनी भागावर रंग टाकला. घराच्या परिसरात विविध ठिकाणी पत्यातील जोकरची चित्र चिटकवली. बनावट खात्यावरून तो जयकुमार यांच्या मित्रांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू लागला आहे. त्यावर भुजबळ यांची बदनामी होईल, अशी माहिती शेअर करू लागल्याने भुजबळ कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. याबाबत परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले, भुजबळ कुटुंबीयांना भयभीत करणारा माथेफिरू त्यांना ओळखणाऱ्यांपैकी असावा, असा अंदाज आहे. लवकरच त्याची माहिती मिळवून योग्य ती कारवाई केली जाईल.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाPoliceपोलिस