शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त अशोक कुलकर्णी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 19:28 IST

सलग बारा वर्षे विनोद दोशी नाट्य महोत्सव तथा सारंग नाट्य महोत्सवाचे केले आयोजन

ठळक मुद्देनाट्यक्षेत्रात पडद्यमागे उभा राहून उभारली मोलाची कामगिरी

पुणे: साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त आणि भारतभरातल्या सर्वभाषिक प्रायोगिक नाटकमंडळींचे आधारस्तंभ अशोक कुलकर्णी यांचे आज ४ मेला निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. नुकतीच त्यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर प्रकृतीची गुंतागुत वाढत गेली. त्यांना प्रयाग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

अशोक कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण गावात झाले. त्यांनी इंडियन डेमोग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट, फायनान्शियल एक्सप्रेस अशा अनेक संस्थांमध्ये महत्वाच्या पदावर काम केले. या काळात त्यांच्या मुंबईतील वास्तव्यात त्यांचा तत्कालीन प्रयोगशील नाटक आणि सिनेमा करणाऱ्या अनेक कलावंतांशी मैत्री झाली. सत्यदेव दुबे, विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड, गोविंद निहलानी अशा अनेक दिग्गज कलावंताचा तो सुरवातीचा काळ होता. पुढे अशोक कुलकर्णी वालचंद इंडस्ट्रीज मध्ये महत्त्वाच्या पदावर काम करून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचा काळ हा त्यांनी खऱ्या अर्थाने पुन्हा आपल्या आवडीच्या म्हणजेच नाटकाच्या क्षेत्रात व्यतीत करायचे ठरवले. पडद्यामागे उभे राहून त्यांनी गेल्या वीस वर्षांत अतिशय मोलाची कामगिरी निभावली.

परफॉरमिंग आर्ट या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या तरुण रंगकर्मींचा सन्मान करणारी विनोद दोषी फेलोशिप त्यांनी सुरू केली.  पुढे तेंडुलकर दुबे फेलोशिप आणि मधू गानू फेलोशिप अशा नावाने ह्या फेलोशिप दिल्या गेल्या आहेत. आजवर ७२ जणांना ह्या फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे.

 २००८  ते २०२० सलग बारा वर्षे विनोद दोशी नाट्य महोत्सव तथा सारंग नाट्य महोत्सवाचे आयोजन करून पुणे शहराच्या लौकिकात मोलाची भर घातली. साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने रंगभूमीच्या इतिहासाचा मागोवा घेणारे ' सीन्स वी मेड', तेंडुलकरांच्या लेखन -नाट्य- चित्रपट कारकिर्दीवर अनेकांनी  लिहिलेले 'अजून तेंडुलकर' अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली. त्यातल्या 'प्रायोगिक रंगभूमी- तीन अंक' या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. नाटककारांची प्रयोगशाळा असा 'रंगभान' नावाचा दीड वर्षे चालणारा उप्रकम त्यांनी चालवला. आताच्या कोविडच्या काळात देखील नाटक करणाऱ्या लोकांना उभारी मिळावी. तसेच त्यांनी नव्या पद्धतीने नाटकाकडे पाहावे यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेartकलाMaharashtraमहाराष्ट्र