शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

मुख्यमंत्र्यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस अधिसभा निवडणुकीत अखेर शेवटच्या फेरीत विजयी, मोठ्या संघर्षानंतर मिळाला विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 05:00 IST

अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे चुरशीच्या झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना बाराव्या फेरी अखेर

 पुणे  - अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे चुरशीच्या झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना बाराव्या फेरी अखेर पदवीधरच्या जागेवर विजय मिळाला. त्यांना पसंती क्रमांकावर झालेल्या या निवडणुकीत फडणवीस यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला.सोमवारी सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या मतमोजणीचे अंतिम निकाल मंगळवारी पहाटे ३ वाजता जाहीर झाले. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पदवीधरच्या १० तर व्यवस्थापन प्रतिनिधींच्या ६ जागांसाठी निवडणूक पार पडली. अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व्यवस्थापन प्रतिनिधी पदासाठी बिनविरोध निवडून आल्या. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील हे व्यवस्थापन प्रतिनिधी पदावर निवडून आले. 

मुख्यमंत्र्यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस यांनी विद्यापीठ विकास मंच प्रणित एकता पॅनल कडून उमेदवारी दाखल केली होती. ते या निवडणुकीत सहज विजयी होतील असे चित्र निर्माण करण्यात आले असताना प्रत्यक्षात विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठा झगडा करावा लागला. खुल्या गटातील शेवटच्या ५ जागेवर १२ व्या फेरीनंतर ते विजयी झाले.

विद्यापीठ विकास मंचला धक्कामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू प्रसेनजीत फडणवीस यांना विजयासाठी बाराव्या फेरी पर्यन्त घाम गाळावा लागल्याने राहिल्याने विद्यापीठ विकास मंचला मोठा धक्का बसला. फडणवीस पहिल्या फेरीत निवडून येतील त्यामुळे जास्तीची पहिल्या पसंतीची मते दुसऱ्या उमेदवारांना देण्याचे नियोजन मंचाकडून करण्यात आले होते. मात्र पहिल्या फेरीत प्रसेनजीत चौथ्या क्रमांकावर राहिले.

अधिसभा निवडणुक अंतिम निकालपदवीधर1. संतोष ढोरे - खुला गट2. अनिल विखे- खुला गट3. तानाजी वाघ - खुला गट4. अभिषेक बोके - खुला गट5. प्रसेनजीत फडणवीस - खुला गट

राखीव गट :6. दादासाहेब शिनलकर - ओबीसी7. बागेश्री मंठाळकर - महिला राखीव8. विश्वनाथ पाडवी - ST राखीव9. शशिकांत तिकोटे - SC राखीव10. विजय सोनावणे - NT राखीव

व्यवस्थापन प्रतिनिधीविजयी उमेदवार1. सुनेत्रा पवार - बिनविरोध 2 सोमनाथ पाटील3. श्यामकांत देशमुख4. संदीप कदम5. राजेंद्र विखे-पाटील

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका