शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींकडून इंधन दर कमी करण्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 06:09 IST

पेट्रोल व डिझेलची दरवाढ केंद्र सरकारने केली असली, तरी ती कमी करणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शक्य आहे

पुणे : पेट्रोल व डिझेलची दरवाढ केंद्र सरकारने केली असली, तरी ती कमी करणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शक्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास ४ ते ८ रुपयांनी पेट्रोल व डिझेल स्वस्त होईल, असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी इंधन दरवाढीचा केंद्र सरकारचा चेंडू मुख्यमंत्र्यांकडे टोलवला.केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्राच्या जनधन योजनेपासून ते उज्ज्वला गॅस जोडणीपर्यंत अनेक योजनांची माहिती दिली. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ तसेच स्वच्छ भारत यासारख्या योजनांमधून केंद्र सरकार जनहिताच्या गोष्टींना किती प्राधान्य देत आहे ते दिसते. डीबीटीसारख्या योजनेंतर्गत लाभार्थींच्या खात्यात थेट रक्कम जमा होत असल्यामुळे सर्वच योजनांमधील भ्रष्टाचार थांबल्याचा दावा गडकरी यांनी केला. भाजपा सरकार घटना बदलण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप केला जात आहे. त्याबाबत विचारले असता गडकरी यांनी काँग्रेस सरकारने एकूण ७२ वेळा घटनेत बदल केला. त्यावेळी कधी त्यांच्यावर घटना बदलत आहेत, असा आरोप केला गेला नाही याकडे लक्ष वेधले. भाजपाची स्पष्ट बहुमताने सत्ता आल्याने सत्तेवरून गेलेल्यांकडूनच असे आरोप केले जात आहेत. केंद्र सरकारमध्ये मी काम करतो व सरकारचा घटना बदलण्याचा मुळीच विचार नाही, असे गडकरी यांनी सांगितले.मतदानासाठीच्या यंत्रांमध्ये गडबड होत असल्याच्या आरोपाचाही गडकरी यांनी समाचार घेतला. यंत्राद्वारे मतदान लवकर होते, लवकर मोजले जाते. त्याचे फायदे जास्त आहेत. त्यांचे उमेदवार विजयी होतात त्या ठिकाणी यंत्रामध्ये गडबड आहे असे बोलले जात नाही व भाजपाचा विजय झाला की यंत्रात गडबड असल्याची टीका होते. त्यात काहीही तथ्य नाही, अशा शब्दांत गडकरी यांनी हा आरोप फेटाळून लावला.रस्त्यांवर होत असलेल्या टोल वसुलीबाबत बोलताना गडकरी यांनी आपण स्वत: कधीही टोल बंद करणार असे बोललो नसल्याचे स्पष्ट केले. रस्ते चांगले हवे असतील तर त्यासाठी टोल द्यावा लागेल. तो अवाजवी होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल.राज्यातच नव्हे, तर देशात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी निधी लागतो. सरकार सर्व कामे करणार नाही. त्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घ्यावी लागते. त्यातून टोल वसुली येते. टोलसुरूच राहतील, ते बंद होणार नाहीत, असे गडकरी म्हणाले.