मुख्यमंत्र्यांची वरवंड येथे आज प्रचारसभा
By Admin | Updated: February 14, 2017 01:49 IST2017-02-14T01:49:37+5:302017-02-14T01:49:37+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारार्थ सभेसाठी दौड़ तालुक्यात मंगळवारी

मुख्यमंत्र्यांची वरवंड येथे आज प्रचारसभा
यवत : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारार्थ सभेसाठी दौड़ तालुक्यात मंगळवारी (दि.१४) येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदार संघातील वरवंड (ता.दौड़) येथील सभेत मुख्यमंत्री फडणवीस नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात याकडे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागणार आहे.
दौड़ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा , रासपा व आरपीआय एकत्रित आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर विजय मिळविल्यानंतर प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री तालुक्यात जाफब हीर सभा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाकलेकिल्ला असलेल्या दौड़ तालुक्यात मागील काही निवडणुकांमध्ये सातत्याने अपयश मिळत होते.मात्र बाजार समिती व दौड़ नगरपालिकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दौंडचा बालेकिल्ला सर करण्यात मोठी ताकद लावत आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकार वर टीका केली होती.आता मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.