शहराच्या प्रश्नांचा मुख्यमंत्री घेणार आढावा
By Admin | Updated: November 23, 2014 00:02 IST2014-11-23T00:02:16+5:302014-11-23T00:02:16+5:30
शहरातील तसेच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 25 नोव्हेंबर रोजी पुणो दौ:यावर येणार आहेत.
शहराच्या प्रश्नांचा मुख्यमंत्री घेणार आढावा
पुणो : शहरातील तसेच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 25 नोव्हेंबर रोजी पुणो दौ:यावर येणार आहेत. पालिकेच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावाही ते घेणार असून, त्यासाठी राज्य शासनाकडून पालिका प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रंनी दिली. मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर फडणवीस यांचा हा पहिला पुणो दौरा असल्याने शहरातील रखडलेल्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मेट्रो, जेएनएनयूआरएमचे अनुदान, रखडलेली एसआरए योजना, पीएमआरडीए, रिंग रोड, सार्वजनिक वाहतूक, तसेच पर्यावरणाशी निगडित अनेक प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. मात्र, त्याबाबत वेळीच निर्णय न घेता आल्याने शहराला अनेक समस्या भेडसावत असल्याची कबुलीही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणो दिली होती. हे प्रश्न आता नवीन सरकार सोडविणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागलेले होते. (प्रतिनिधी)
पालिका अधिका:यांची तातडीची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस यांचा
दौरा असल्याने उद्या (रविवारी) महापालिका आयुक्तांनी
पालिका अधिका:यांची
तातडीची बैठक बोलावली
असून तीमध्ये शहरातील प्रश्नांची माहिती सादर करण्याबाबत चर्चा
करण्यात येणार असल्याचे
सूत्रंनी स्पष्ट केले.