शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी मुख्यमंत्री पुण्यात : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 01:48 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून शहरातील विविध विकासकामांचा धडाका सुरू केला आहे.

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून शहरातील विविध विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. येत्या शनिवारी (दि. ९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सणस मैदानावर दुपारी ३ वाजता स्मार्ट सिटीच्या अंतर्गत स्मार्ट इलेक्ट्रिक बस, स्मार्ट सिटी आॅपरेशन्स सेंटर, आॅफिस राइड, बाणेर येथील स्मार्ट रस्ते पुनर्रचना, प्लेसमेकिंग साइट, स्मार्ट स्कूल्स आणि सायन्स पार्क आदी सात प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.राजीव गांधी इन्फोटेक पार्कला येणाऱ्या सुमारे साडेतीन लाख कॉर्पोरेट कर्मचाºयांना दैनंदिन प्रवासासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. स्मार्ट रस्ते पुनर्रचन अंतर्गत पुणे शहराकरिता स्मार्ट सिटी प्लॅनचा एक भाग म्हणून औंध-बाणेर-बालेवाडी परिसरात रस्त्यांचे पुनर्रचना प्रकल्प प्रस्तावित केले गेले आहेत. या प्रकल्पांतर्गत तब्बल ३०० कोटी रुपये खर्च करून ४२ किलोमीटर लांबीचे स्मार्ट स्ट्रीट करण्यात आले आहे. यातील मिटकॉनरस्त्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार आहेत.याशिवाय प्लेसमेकिंग साइट अंतर्गत वापरात नसलेल्या भूखंडाचा कायापालट करण्याचे काम स्मार्ट सिटी करणार आहे. यामध्ये सायन्स पार्क आणि बुकझानिया या दोन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.स्मार्ट स्कूल प्रकल्पात जागतिक दर्जाचे राहणीमानाच्या मानदंडाप्रमाणे शहरामध्ये स्मार्ट स्कूल सुरू करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यातयेणार असल्याचे टिळक यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात १५० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार१ याबाबत महापौर टिळक यांनी सांगितले की, शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत टप्प्या-टप्प्याने ५०० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १५० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येणार असून, याचा लोकार्पण शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.२ स्मार्ट सिटी आॅपरेशन्स सेंटर ‘एससीओसी’ हे एक उच्च दर्जाचे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे, जे शहरातील विविध कामकाजांची देखरेख व व्यवस्थापन करण्यासाठी सध्याचे स्मार्ट इलेमेंट्स आणि भविष्यातील आयटी इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यातील विकसित स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरला संलग्न करण्याची क्षमता यामध्ये आहे.३ ‘आॅफिस राइड’च्या माध्यमातून शेअरिंगमध्ये प्रवास करण्यासाठीचेअ‍ॅप- सामायिक दळणवळणाचा म्हणजेच शेअर्ड मोबिलिटीचा वापर करण्यास प्रोत्साहित करून वाहतूककोंडी आणि प्रदूषण कमी करण्यात येणार आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे