मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2015 09:01 IST2015-07-27T09:01:40+5:302015-07-27T09:01:53+5:30

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली.

The Chief Minister made a dream about Mahatmaji of Vitthal | मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची महापूजा

मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची महापूजा

ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. २७ - आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली, यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. शेतकरी सुखी तर राज्य सुखी असे सांगत राज्यातील अवर्षणाचं सावट दूर होवोस असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला घातलं. महापूजा करायची संधी मिळाल्याने मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाचे आभार मानले. महापूजेवेळी एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, माधव भंडारी तसेच भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

दरम्यान यंदा विठ्ठल-रखमुमाई मंदिरातील पूजेचा मान हिंगोलीच्या धांडे दांपत्याला मिळाला. राघोजी व संगीता धांडे गहे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत, त्यांनाच आज पूजेचा मान मिलाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धांडे दांपत्याचा सत्कारही करण्यात आला. 

 

 

Web Title: The Chief Minister made a dream about Mahatmaji of Vitthal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.