मुख्यमंत्र्यांना पुण्याबद्दल आकस

By Admin | Updated: February 16, 2017 03:22 IST2017-02-16T03:22:48+5:302017-02-16T03:22:48+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्याबद्दल आकस आहे, अढी आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास फार झाला, आता थांबायला हवे,

The Chief Minister expressed concern about Pune | मुख्यमंत्र्यांना पुण्याबद्दल आकस

मुख्यमंत्र्यांना पुण्याबद्दल आकस

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्याबद्दल आकस आहे, अढी आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास फार झाला, आता थांबायला हवे, असे त्यांचे मत आहे. पुण्यासाठी हा विचार घातक आहे. त्यामुळे भाजपाच्या विरोधात मतदान करा, काँग्रेसच्या अधिकृत व पुरस्कृत उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कसबा सोमवार भागातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सदाआनंद नगर येथे चव्हाण यांनी सभा झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, रोहित टिळक आदी या वेळी उपस्थित होते. चव्हाण यांनी या वेळी मुख्यमंत्री तसेच केंद्र व राज्य सरकारवर हल्ला चढविला.
चव्हाण म्हणाले, ‘‘पुण्याबद्दल मुख्यमंत्र्याच्याच नव्हे, तर भाजप सरकारच्याच मनात अढी दिसते आहे. त्यामुळेच मेट्रोसारखा प्रकल्प त्यांनी आधी नागपूरला नेला. त्याशिवाय उद्योग, व्यवसाय अशा अनेक गोष्टी ते नागपूरला नेत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान का करायचे, याचा विचार करा.’’

Web Title: The Chief Minister expressed concern about Pune