शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मुख्यमंत्र्यांकडे ‘एक्झॅक्ट’ आकडा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:25 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे परिसरात पाच वर्षांत किती गुंतवणूक आणि किती रोजगार निर्माण झाले, या प्रश्नाचे नेमके उत्तर देता आले नाही.

पुणे : रोजगार निर्मिती आणि गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे परिसरात पाच वर्षांत किती गुंतवणूक आणि किती रोजगार निर्माण झाले, या प्रश्नाचे नेमके उत्तर देता आले नाही. ‘एक्झॅक्ट’ आकडा नाही. परंतु, आनंदाची बाब ही आहे, की सर्वाधिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती पुण्यात झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.देशात निर्माण झालेल्या एकूण रोजगारांपैकी २५ टक्के रोजगार एकट्या महाराष्ट्रात तयार झाले. गुंतवणूक करार प्रत्यक्षात येण्याचे देश पातळीवरचे प्रमाण ३५ टक्के आहे तर महाराष्ट्रात हेच प्रमाण ४५ टक्के आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पुण्यात मुख्यमंत्र्यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला.मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी जाहीर करावी - चव्हाणरोजगारनिर्मितीबाबत केलेल्या दाव्याशी मुख्यमंत्री प्रामाणिक असतील तर महाराष्ट्रात विभागनिहाय नेमके किती रोजगार निर्माण झाले, याची विस्तृत आकडेवारी त्यांनी जाहीर करावी, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.रोजगाराच्या आकड्यांबाबत विपर्यास करून मुख्यमंत्री एकप्रकारे जनतेसोबत लबाडी करीत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.ते म्हणाले, भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील ६ लाख उद्योग बंद पडले असून, त्यात राज्यातील सुमारे १ लाख ४१ हजार उद्योगांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेली २४ हजार शिक्षकांची आणि ७२ हजार शासकीय पदांची मेगाभरती पूर्ण झालेली नाही.>‘होर्डिंग लावल्याने तिकीट मिळत नाही’महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर तिकीटासाठी इच्छुक भाजप कार्यकर्त्यांनी शहरभर फ्लेक्स-होर्डिंग लावून शहर विद्रूप केले. यासंबंधी विचारले असता, अशाप्रकारे होर्डिंग लावणे चुकीचे असून होर्डिंग लावल्याने कोणालाही तिकीट मिळत नाही तर काम पाहूनच तिकीट देणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस