शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:19 IST

कुंडमाळ येथील पूल दुर्घटनेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

CM Devendra Fadnavis on Maval bridge collapse: मावळ येथील इंद्रायणी नदीवरील ३५ वर्षे जुना पूल कोसळून चार पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. कुंडमळा पुलावरुन अनेकजण नदीपात्रात पडले होते. रविवार असल्याने पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. पर्यटकांच्या वजनामुळे अचानक पूल मधोमध तुटून कोसळला. या घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर येथे माध्यमांशी बोलताना या पुलाचे काम सुरु झालं असतं, तरी इतक्या लवकर तो तयार झाला नसता असं म्हटलं आहे. 

"१० जूनला कंत्राट दिल्यानंतर जरी काम सुरु झालं असतं तरी एवढ्या लवकर तो पूल तयार झाला नसता. जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल धोकादायक आहे अशी घोषणा केली होती. हा पूल धोकादायक असल्याची पाटी गावकऱ्यांनीही लावली होती. दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले. अनेकवळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही. यामध्ये कुणाची नाहीये किंवा इतका तो कमकुवत झालाय असं त्यांना वाटलं नसेल. त्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी गेले. यातून भविष्यासाठी शिकण्याकरता गोष्टी आहेत. पावसाळ्यात पर्यटक जिथे जातात अशा ५०० जागा आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितले. लोकांना सुरक्षित कसे ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी पूल दुर्घटनेबाबत संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरही मुख्यमंत्र्‍यांना प्रश्न विचारला. "काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, काही लोक देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपांचे पडलं आहे. मी अशा लोकांना उत्तर द्यायला बसलेलो नाही," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणेAccidentअपघात