खाऊ बेतला असता चिमुरडीच्या जिवावर
By Admin | Updated: October 11, 2015 04:20 IST2015-10-11T04:20:35+5:302015-10-11T04:20:35+5:30
अंगणवाडीत गेलेल्या चिमुरडीला लाडालाडाने दिलेला सीताफळाचा खाऊ तिच्या जिवावर बेतल्याची घटना भिगवण (ता. इंदापूर) येथे घडली. या बालिकेच्या श्वासनलिकेतच सीताफळाची

खाऊ बेतला असता चिमुरडीच्या जिवावर
बारामती : अंगणवाडीत गेलेल्या चिमुरडीला लाडालाडाने दिलेला सीताफळाचा खाऊ तिच्या जिवावर बेतल्याची घटना भिगवण (ता. इंदापूर) येथे घडली. या बालिकेच्या श्वासनलिकेतच सीताफळाची बी अडकली. सुदैवाने बारामती शहरातील डॉक्टरांनी तातडीने उपचार करून सीताफळाची बी काढली. त्यामुळे या बालिकेचा जीव बचावला.
जान्हवी मोरे (वय ४, रा. भिगवण) असे या बालिकेचे नाव आहे. शनिवारी तिची आई तिला अंगणवाडीत घेऊन गेली. या वेळी जान्हवीने तिच्या आईला खाऊ मागितला. त्यामुळे तिला सीताफळ दिले. सीताफळ खाल्ल्यानंतर काही वेळातच जान्हवी अत्यवस्थ झाली. त्यामुळे घाबरून गेलेल्या तिच्या आईने तिच्या वडिलांसह दवाखाना गाठला. डॉक्टरांनी तिची तपासणी करून बारामतीला हलविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तिला बारामतीतील एका रूग्णालयात आणण्यात आणले. या वेळी डॉक्टरांनी तातडीने उपचार करत तीच्या श्वसननलीकेत अडकलेली बी काढूत तीला जीवनाद दिले.