प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:30 IST2021-02-20T04:30:46+5:302021-02-20T04:30:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिक्रापूर : प्रशासकीय अधिकारी संकेत शांताराम भोंडवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय ...

Chhatrapati Shivaji Maharaj Gaurav Award to Administrative Officer Sanket Bhondwe | प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार

प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

शिक्रापूर : प्रशासकीय अधिकारी संकेत शांताराम भोंडवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

शिवनेरी गडावर शुक्रवारी शिवजयंती कार्यक्रमाप्रसंगी भोंडवे यांना हा पुरस्कार देण्यात आला. किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळ समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा झाला. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, आमदार विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते. मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संकेत शांताराम भोंडवे हे सध्या भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतुक व परिवहन मंत्रालयाच्या सचिवपदी कार्यरत आहेत. संकेत भोंडवे मूळचे खेड तालुक्यातील असून त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पिंपरी चिंचवड येथे झाले. भोंडवे यांनी अथक परिश्रम घेऊन चौथ्या प्रयत्नात १४ मे २००७ रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत देशात विद्यार्थ्यांमध्ये १३४ वा क्रमांक पटकावला. त्यानंतर मध्यप्रदेश केडरसाठी त्यांची नियुक्ती झाली. या दरम्यान त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवला. याचे फलित म्हणून दिव्यांग कल्याण, ज्येष्ठ नागरिक कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०१७मध्ये त्यांना विविध पुरस्कार मिळाले. बारा ज्योतिर्लिंगांमधील एक असलेल्या उज्जैन येथे दिव्यांगांसाठी तयार केलेल्या खास सुविधांसाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

फोटो : शिवनेरी गडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संकेत भोंडवे यांना पुरस्कार देताना(धनंजय गावडे)

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Gaurav Award to Administrative Officer Sanket Bhondwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.