छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:08 IST2021-06-27T04:08:37+5:302021-06-27T04:08:37+5:30

शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस येथे पुणे जिल्हाध्यक्ष हुलगेश चलवादी यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ...

Chhatrapati Shahu Maharaj Jayanti in excitement | छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात

छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात

शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस येथे पुणे जिल्हाध्यक्ष हुलगेश चलवादी यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी चलवादी यांनी सांगितले की शाहू महाराज हे आरक्षण देणारे पहिले राजे होते .कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारे तसेच अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद यावर प्रहार करणारे एकमेव राजे होते. यावेळी त्यांच्या समवेत विजय गायकवाड, हौसराम आल्हाट, सुमेध सोनवणे, प्रशांत पवार, निलेश धिवार आदी उपस्थित होते.

फोटो ओळ -वडगाव शेरी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने पर्वती येथील शाहू महाराज महाविद्यालयातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुणे शहर अध्यक्षा आश्विनी परेरा व ॲड. रेणुका चलवादी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या समवेत कबड्डीपटू कोमल गोळे, शिल्पा भोसले आदी उपस्थित होते.

Web Title: Chhatrapati Shahu Maharaj Jayanti in excitement