छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:27+5:302021-04-11T04:11:27+5:30
श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे याबाबत आज पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या उपस्थितीत नियोजन बौठक झाली त्यावेळी सहाय्यक आयुक्त ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द
श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे याबाबत आज पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या उपस्थितीत नियोजन बौठक झाली त्यावेळी सहाय्यक आयुक्त किशोर जाधव, लोणी कंद पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप मानकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, रुपेश शिवले, लोचन शिवले, नवनाथ शिवले, राजाराम शिवले, रमेश शिवले, पांडुरंग शिवले, तुळापूरच्या सरपंच गुंफा इंगळे, रविंद्र वाळके, मंडल अधिकारी किशोर शिंगोटे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे उपस्थित होते.
यावेळी उपायुक्त देशमुख म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुण्यतिथीला शासकीय पूजेनंतर पोलिस दलाकडून शासकीय मानवंदनेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. या कार्यक्रमाचे फेसबुक व युट्युब आदी सोशल साईटवर लाईव्ह प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीने जबाबदारी घेतली आहे.
सहाय्यक आयुक्त किशोर जाधव म्हणाले, संभाजी महाराजांच्या अनुयायांनी अभिवादनासाठी बाहेर पडणे गरजेचे नसून त्यांनी घरातूनच महाराजांना अभिवादन करावे. स्वागत व सूत्रसंचालन माजी उपसरपंच संतोष शिवले यांनी केले. माजी उपसरपंंच अमोल शिवले यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : १०लोणी कंद संभाजी महाराज पुण्यतिथी
फोटो ओळी- श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त पंकज देशमुख.