छत्रपती संभाजीमहाराज पुण्यस्मरणदिन सोमवारी
By Admin | Updated: March 22, 2017 03:26 IST2017-03-22T03:26:47+5:302017-03-22T03:26:47+5:30
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२८ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि. २७) सकाळी ८ ते १२ या वेळी तुळापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती संभाजीमहाराज पुण्यस्मरणदिन सोमवारी
पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२८ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि. २७) सकाळी ८ ते १२ या वेळी तुळापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी सरपंच रुपेश शिवले, उपसरपंच अमोल शिवले आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूमहाराज यांना
साथ देणाऱ्या मावळ््यांच्या
वंशजांचा सन्मान करण्यात येणार आहे.
पुरंदर ते श्रीक्षेत्र तुळापूर या मार्गाने छत्रपती संभाजीमहाराज पालखीचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच या पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. शंभूभक्तांच्या उपस्थितीत मानवंदना देऊन हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)