कुरकुंभ येथे रसायनाचा टँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:11 AM2021-01-18T04:11:14+5:302021-01-18T04:11:14+5:30

कुरकुंभ : येथे पुणे सोलापुर महामार्गावर औद्योगीक क्षेत्राच्या परिसरात रसायन वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने मोठी ...

The chemical tanker overturned at Kurkumbh | कुरकुंभ येथे रसायनाचा टँकर उलटला

कुरकुंभ येथे रसायनाचा टँकर उलटला

Next

कुरकुंभ : येथे पुणे सोलापुर महामार्गावर औद्योगीक क्षेत्राच्या परिसरात रसायन वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. पोलिसांनी याची दखल घेत तत्काळ या मार्गावरील वाहतूक व्यवस्था बंद केली.

पोलीसांनी कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील अग्निशामक दलाने क्रेनच्या साहायाने टक्र बाजुला केला. मात्र, बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

पुणे सोलापुर महामार्गावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ येथील सामयीक सांडपाणी केंद्राच्या (सीईपीटी) च्या धोकादायक वळणावर मुंबई येथुन येणारा रसायनाचा टँकटर आणि एका कारचा अपघात झाला. या घटनेत रसायनाचा टँखर रस्त्यावर उलटला. या अपघातात कार मधील एकजण तर टँकर चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्यांना तातडीने दौंड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. टँकर उलटल्याने त्यातील रसायन रस्त्यावर सांडले. यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे काही काळासाठी पुणे सोलापुर महामार्गावरील वाहतूक दौंड मार्गे वळवण्यात आली होती. टँकरमध्ये कुठले रसायन होते हे समझु शकले नाही. पोलीसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखुन परिसरातील नागरिकांना दूर राहण्याचे आवाहन करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी अपघातस्थळी येत अपघातग्रस्त टँकर तब्बल पाच क्रेन साह्याने उभा केला.

फोटो ओळ : अपघातग्रस्त वाहने

Web Title: The chemical tanker overturned at Kurkumbh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.