शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्यावर पुस्तकामुळे मात : बी. एन. गोखले; ‘अपराजित’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 12:29 IST

आजकाल आपण बघतो की छोट्या छोट्या प्रसंगांनी लोक निराश होतात, नैराश्यावर मात कशी करायची याचे शिक्षण हे पुस्तक देते.’’ असे मत एअर मार्शल (निवृत्त) बी. एन. गोखले यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देमनोविकास प्रकाशनतर्फे ‘अपराजित’ पुस्तक प्रकाशनअनिलकुमारचे भविष्य उज्वल असताना २४व्या वर्षी त्याच्या करियरला ब्रेक लागला : सुनीती जैन

पुणे : ‘‘आजकाल आपण बघतो की छोट्या छोट्या प्रसंगांनी लोक निराश होतात, आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारतात; पण अनिलकुमारचे चरित्र वाचल्यानंतर असे वाटते की आपले दु:ख हे त्याच्यापुढे काहीच नाही आहे. नैराश्यावर मात कशी करायची याचे शिक्षण हे पुस्तक देते.’’ असे मत  एअर मार्शल (निवृत्त) बी. एन. गोखले यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत असताना दिवंगत फ्लाइंग आॅफिसर एम. पी. अनिलकुमार यांना अपघातामुळे आलेले विकलांगत्व आणि त्यांनी या विकलांगतेवर मात करण्यासाठी दिलेली अभूतपूर्व झुंज यावर आधारित ‘अपराजित’ पुस्तक प्रकाशन (जीवनचरित्र) सोहळ्यात ते बोलत होते. मनोविकास प्रकाशनतर्फे गरवारे कॉलेज आॅफ कॉमर्स येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, अनिलकुमारचे भावपूर्ण शब्दांत इंग्रजीमध्ये जीवनचरित्र साकारलेले नितीन साठे, सदर पुस्तकाच्या मराठी अनुवादिका सुनीती जैन आदी उपस्थित होते. या वेळी अनुवादिका सुनीती जैन म्हणाल्या, अनिलकुमारचा २४व्या वर्षी अपघात झाला आणि पुढची २६ वर्षे त्याने नियतीशी झगडत सैनिकांच्या पुनर्वसन केंद्रात काढले. हे इतके सोपे काम नव्हे. अनिलकुमारचे भविष्य उज्वल असताना २४व्या वर्षी त्याच्या करियरला इतका करकचून ब्रेक लागला, ज्यामध्ये त्याचं सगळं भवितव्य उद्ध्वस्त झालं. त्या वेळी तोही नैराश्यामध्ये गेला. पण तिथले कर्मचारी, त्याचे कुटुंबीय, त्याच्या गावातील लोकांनी मिळून त्याला प्रोत्साहन दिले. आणि तो शेवटी तोंडात पेन धरून लिहायला लागला. त्याच्या लिहिलेल्या लेखांमुळे त्याचे खूप नाव झाले. या माध्यमातून त्याच्यासाठी जगाचा एक मोठा दरवाजा उघडा झाला आणि त्याच्यातून त्याला जगण्याचा अर्थ सापडला. त्याने खूप लेख लिहिले. बरोबरच्या मित्रांच्या अडचणी सोडवल्या. अशा प्रकारे त्याने अनेकांना मदत केली. सूत्रसंचालन अरविंद पाटकर यांनी केले. 

टॅग्स :Puneपुणे