पालखी मार्गावरील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी
By Admin | Updated: July 5, 2015 00:26 IST2015-07-05T00:26:35+5:302015-07-05T00:26:35+5:30
वारीदरम्यान पिण्याच्या पाण्याची तसेच इतर सुविधा चांगल्या पद्धतीने देता याव्यात, यासाठी पुरंदर पंचायत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भगवंत पवार

पालखी मार्गावरील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी
सासवड : वारीदरम्यान पिण्याच्या पाण्याची तसेच इतर सुविधा चांगल्या पद्धतीने देता याव्यात, यासाठी पुरंदर पंचायत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भगवंत पवार व गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवस पालखी महामार्गाशेजारील पाण्याच्या सर्व स्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी वारीसाठी रविवारी (दि. १२) सासवड येथे मुक्कामी येत आहे. तसेच गुरुवारपर्यंत (दि. १६) पालखी पुरंदर तालुक्यात आहे. या काळात झेंडेवाडी ते नीरा या पालखी मार्गावरील पिण्याच्या पाण्याचे जे स्रोत आहेत.
त्याचे सर्व नमुने तपासणीसाठी दिले असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली. या वेळी आरोग्य
सहायक संजय शिंदे, आरोग्य पर्यवेक्षक अशोक दोडके, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
ज्या विहिरींवरून पिण्याच्या पाण्याचे टँकर भरून देणार आहेत त्या ठिकाणी आरोग्य विभागाचा कमर्चारी टीसीएल पाहणीसाठी २४ तास कार्यरत असणार आहे.
तसेच पालखी मार्गावरील गावातून मोफत मदर सोल्युशनचे वाटप करण्यात येणार आहे. कीटकशास्त्रीय सर्वेक्षणाच्या माध्यमातून २ जुलैपासून घरोघरी
डेंगी तपासणी सुरू करण्यात
आली आहे. तसेच विविध आजारांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. १० व ११ जुलै रोजी
धुराळणी करण्यात येणार आहे.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अशोक राजगीर यांच्या मार्गदर्शनाखाली धुराळणी करण्यात येणार आहे. तर मार्गावरील ग्रामपंचायतींनी टीसीएल खरेदी करून ठेवली आहेत.
पालखीअगोदर पाच दिवस हे टीसीएल स्रोत असणाऱ्या ठिकाणी टाकले जाईल. भोर येथून
अतिरिक्त कमर्चारी बोलाविले जातील, असे डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले. (वार्ताहर)